Sanjay Bangar on KL Rahul: माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर आशिया चषक २०२३ साठी के.एल. राहुलची भारतीय संघात निवड झाली आहे. “जर राहुल आशिया कप २०२३ मध्ये खेळत असेल तर त्याने फक्त यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळावे असे त्याने सांगितले आहे. जर तो फलंदाज म्हणून खेळत असेल तर त्याला प्लेइंग-इलेव्हनमध्ये संधी देणे योग्य होणार नाही.” आणखी काय म्हणाले संजय बांगर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय बांगर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “मला वाटते भारतीय संघात एक यष्टीरक्षक फलंदाज आहे जो गोलंदाजी देखील करू शकतो, याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला ६ गोलंदाजीचे पर्याय हवे असतील तर तुमच्या पहिल्या ५ मध्ये एक स्पेशलिस्ट फलंदाज खेळाडू म्हणून असावा. बाकी उर्वरित गोलंदाजी करू शकतात किंवा यष्टिरक्षक फलंदाज असावा. त्यामुळे मला असे वाटते की, के.एल. राहुलने यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका निभावली तरच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले पाहिजे कारण, त्यामुळे संघाचा समतोल राखला जाईल.”

२०२३ आशिया चषक सुरू होताच, भारत त्यांच्या घरच्या मैदानावर ऑक्टोबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टूर्नामेंटमध्ये दीर्घ विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे ध्येय ठेवणार आहे, याआधी भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, ती शेवटची आयसीसी ट्रॉफी टीम इंडियाने जिंकली होती.

हेही वाचा: Inzamam Ul Haq: इंझमाम-उल-हकने बाबर आझमची केली स्तुती; म्हणाला, “त्याचे फलंदाजीचे तंत्र विराट कोहली…”

संजय बांगर पुढे म्हणाले, “जर के.एल. राहुल फलंदाज म्हणून तंदुरुस्त नसेल तर इशान किशनला प्लेईंग ११मध्ये संधी द्यावी. त्याच्यावर अन्याय होता कामा नये कारण, त्याने काहीही चुकीचे केले नाही. तो एक चांगला फॉर्मात असलेला फलंदाज आणि नियमित यष्टीरक्षक देखील आहे. त्यामुळे, भारत जिथे जिथे ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळणार आहे, तिथे तुम्हाला साहजिकच सुरुवातीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक तंदुरुस्त आणि नंबर वन यष्टिरक्षक हवा असेल, जो अर्धा फिट आहे किंवा त्याला पुन्हा दुखापत होऊ शकते या शंकेच्या भीतीवर मालिका खेळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.”

के.एल. राहुलला आयपीएल २०२३ दरम्यान दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो एनसीएमध्ये रिहॅब म्हणजेच संघात पुनरागमनाची तयारी करत होता आणि मग त्याची आशिया कपसाठी त्याची निवड झाली. त्याच्याबद्दल असे म्हटले जात होते की, तो आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये क्वचितच खेळेल, परंतु तो ज्याप्रकारे सराव करत आहे त्यावरून असे दिसते आहे की पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो फिट होऊन प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतो.

हेही वाचा: Sanju Samson: भारताच्या आशिया कप संघ निवडीवर पाकिस्तानचा ‘हा’ माजी फिरकीपटू संतापला; म्हणाला, “संजू नव्हे तर राहुल हा…”

आशिया कप २०२३ साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के.एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, स्टँडबाय खेळाडू: संजू सॅमसन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak kl rahul will get a chance in playing xi on this condition sanjay bangar revealed avw
Show comments