India vs Pakistan ICC Champions Trophy 2025 Live Match Updates: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकिस्तानचा पराभव करत ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. विराट कोहलीने विजयी चौकार लगावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि आपलं ५१वं वनडे शतक पूर्ण केलं आहे.

न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने पाकिस्तान संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. दुसरीकडे बांगलादेश आणि पाकिस्तानला नमवत भारतीय संघाने सेमी फायनलच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकलं आहे. विराट कोहलीने अनुभव पणाला लावत १११ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली.

Live Updates

India vs Pakistan Live Cricket Score Updates: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारत वि. पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

22:06 (IST) 23 Feb 2025
विराट कोहलीचं शानदार शतक अन् भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे.

सविस्तर वाचा

22:05 (IST) 23 Feb 2025

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, टीम इंडियाने घेतला २०१७ च्या पराभवाचा व्याजासकट बदला

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे.

22:02 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: विराट कोहलीचं शतक

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे.

21:38 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: भारताला दोन विकेट्सचा धक्का

अर्धशतकानंतर श्रेयस अय्यर ५६ धवाा करत खुशदिलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर पुढच्याच षटकात शाहीन आफ्रीदीने हार्दिक पंड्याला झेलबाद केलं आहे.

21:21 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: श्रेयस अय्यरचं अर्धशतक

श्रेयस अय्यरने पाकिस्तानविरूद्ध ६३ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा पूर्ण केल्या आहेत. तर विराट आणि श्रेयसने १०१ धावांची शानदार भागीदारी केली आहे. तर विराट कोहली ८१ धावांवर खेळत आहे.

20:58 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: विराट कोहलीचा महाविक्रम

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. वाचा सविस्तर

विराट कोहलीने वनडेमध्ये घडवला इतिहास, सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडत केली मोठी कामगिरी; जगभरातील सर्व फलंदाजांना टाकलं मागे

20:50 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्ध शानदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले आहे. विराटने या अर्धशतकासह आयसीसी टूर्नामेंटमधील २३ वे अर्धशतक केले आहे आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराट कोहलीने ६२ चेंडूत ५३ धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह भारताने २७ षटकांत २ बाद १३६ धावा केल्या आहेत.

20:39 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. वाचा सविस्तर

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे; वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला सलामीवीर

20:11 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: शुबमन गिल बाद

विराट कोहली आणि शुबमन गिलने संघाचा डाव चांगलाच सावरला होता. पण पाकिस्तानचा फिरकीपटू अबरारच्या गोलंदाजीवर गिल क्लीन बोल्ड झाला. यासह भारताने आपले दोन्ही सलामीवीर गमावले आहेत. यासह भारताने १८ षटकांत २ बाद १०२ धावा केल्या आहेत.

19:52 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: शुबमन गिल-विराटने सावरला भारताचा डाव

रोहितच्या विकेटनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारताचा डाव उचलून धरला आहे. विराट आणि गिलने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. यासह भारताने १३ षटकांत १ बाद ८४ धावा पूर्ण केल्या आहेत.

19:26 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: गिलने घेतला बदला

रोहित शर्माला पाचव्या षटकात शाहीन आफ्रिदीने क्लीन बोल्ड करत भारताला धक्का दिला. पण पुढच्या षटकात शुबमन गिलने रोहितच्या विकेटचा व्याजासकट बदला घेतला आहे. शुबमन गिलने सातव्या ४ षटकात चौकार लगावत १४ धावा केल्या. यासह गिलने भारतावरचा दबाव करत त्यांच्या विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची धुलाई केली.

19:17 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: रोहित शर्मा क्लीन बोल्ड

लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला. पाचव्या षटकातील सहाव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने यॉर्कर चेंडू टाकत रोहित शर्माला क्लीन बोल्ड केलं. रोहित शर्मा १५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २० धावा करत बाद झाला.

19:09 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: भारताच्या डावाला सुरूवात

पाकिस्तानने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताची रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी ही उतरली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल सुरूवातीच्या षटकांपासूनच फटकेबाजी सुरू केली आहे. भारताने ४ षटकांत २६ धावा केल्या आहेत.

18:25 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: पाकिस्तान ऑलआऊट

हर्षित राणाने पाकिस्तानविरूद्ध पहिली विकेट मिळवत पाकिस्तानला ऑल आऊट केलं आहे. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्यात शतकी भागीदारी झाली. पण भारताच्या गोलंदाजांनी संघाला फार धावा करण्याची संधी दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानला सामन्यात टिकू दिलं नाही. पाकिस्तानकडून बाबर आझमने २३ धावांची, सौद शकीलने ७६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली तर मोहम्मद रिझवान ४६ धावा करत बाद झाला. खुशदिल शाह ३८ धावा करत बाद झाला. तर नसीम शाहने १४ धावा केल्या.

भारताकडून कुलदीपने ९ षटकांत ४० धावांत ३ विकेट घेत सामन्याचा रोखच बदलला. तर हार्दिकने ८ षटकांत ३१ धावा देत २ विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. तर हर्षित राणाने, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी १-१ विकेट घेतली.

https://twitter.com/BCCI/status/1893645952876966122

18:20 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: शमीच्या षटकात दोन षटकार

मोहम्मद शमीच्या षटकात हारिस रौफ आणि खुसदिल शाह यांनी एकेक षटकार लगावत २४० धावांचा टप्पा गाठला. तर अखेरच्या चेंडूवर जास्तीची धाव घेण्याच्या नादात हारिस रौफ धावबाद झाला.

18:10 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: कुलदीप यादवने घेतली तिसरी विकेट

कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानला लागोपाठ धक्के दिले आहेत. कुलदीपच्या ४७व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नसीम शाहला झेलबाद करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. यासह पाकिस्तानने ४७ षटकांत ८ बाद २२२ धावा केल्या आहेत.

17:55 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: एका षटकात दोन विकेट

कुलदीप यादवने ४३ व्या षटकात लागोपाठ दोन विकेट घेतले आहेत. चौथ्या चेंडूवर सलमान अली आगा १९ धावांवर झेलबाद झाला. जडेजाने कमालीचा झेल टिपत त्याला झेलबाद केलं. तर पुढच्याच पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रीदी पायचीत झाला.

17:25 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: जड्डूची फिरकी पडली भारी

भारताने एकामागून एक झटपट ३ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने ३७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तय्यब ताहिरला क्लीन बोल्ड करत तिसरी विकेट मिळवली. यासह पाकिस्तानने झटपट ५ विकेट्स गमावल्या आहेत.

17:23 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: हार्दिकची भेदक गोलंदाजी

रिझवाननंतर पाकिस्तानचा अर्धशतकी खेळी केलेला फलंदाज पुढील षटकात बाद झाला. हार्दिकच्या ३५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर सौद शकील मोठा फटका खेळायला गेला पण सीमारेषेजवळ अक्षर पटेलने त्याला झेलबाद केलं. अशारितीने पाकिस्तानने ३५ षटकांत ४ बाद १६० धावा केल्या आहेत.

17:17 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: मोहम्मद रिझवान क्लीन बोल्ड

३३व्या हार्दिकच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर हर्षित राणाने झेल सोडला पण अक्षर पटेलने ३४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रिझवानला क्लीन बोल्ड केलं.

16:55 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: सौद शकीलचे अर्धशतक

पाकिस्तानचा फलंदाज सौद शकीलने सावध फलंदाजी करत आपले महत्त्वपूर्ण अर्धशतक पूर्ण केले आहे. शकिलने ६३ चेंडूत ४ चौकारांसह ५० धावांचा टप्पा गाठला आहे. यासह पाकिस्तानने ३१ चेंडूत २ बाद १३७ धावा केल्या आहेत. तर मोहम्मद रिझवान ४१ धावा करत खेळत आहे. रिझवान शकीलने ९० धावांची भागीदारी केली आहे. तर भारतीय संघही विकेटच्या प्रतिक्षेत आहे.

16:31 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: २५ षटकांत पाकिस्तानने किती धावा केल्या?

भारताच्या गोलंदाजांनी मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांच्या धावांवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. पाकिस्तानकडून रिझवानने जडेजाच्या २५व्या षटकात ५० चेंडूनंतर पहिला चौकार मारला. यासह पाकिस्तानने २५ षटकांत अवघ्या ९९ धावा केल्या आहेत.

16:14 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: भारताची सामन्यावर पकड मजबूत

दोन विकेट्स गमावल्यानंतर पाकिस्तान संघाच्या धावांना चांगलाच ब्रेक लागला आहे. गेले ३५ ते ४० चेंडूंमध्ये संघाने एकही चौकार-षटकार लगावलेला नाही. हार्दिक पंड्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला आहे. तर इतर सर्व गोलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली आहे. पाकिस्तानने २० षटकांत २ बाद ७९ धावा केल्या आहेत. मैदानात मोहम्मद रिझवान आणि सौद शकिलची जोडी आहे.

15:27 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: अक्षर पटेलचा परफेक्ट थ्रो

कुलदीप यादवला रोहित शर्माने १० वे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. पण विकेट मात्र अक्षर पटेलने मिळवून दिली. कुलदीप यादवने इमामला चेंडू टाकला आणि त्याने चेंडू समोरच्या दिशेने खेळत पटकन धाव काढण्यासाठी गेला. नॉन स्ट्राईकर एंडला असलेल्या अक्षर पटेलने लगेच धावत येऊन चेंडू टिपला आणि विकेटच्या दिशेने मारला आणि इमाम झेलबाद झाला. अशारितीने इमाम १० धावा करत बाद झाला. अशारितीने पाकिस्तानने १० षटकांत २ बाद ५२ धावा केल्या आहेत.

रनआऊटचा व्हीडिओसाठी इथे क्लिक करा

https://twitter.com/itsmukeshrishi/status/1893600974884790674

15:17 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: भारताच्या खात्यात पहिली विकेट

भारत वि पाकिस्तान लढतीतील भारताला पहिली विकेट हार्दिक पंड्याने मिळवून दिली आहे. नवव्या षटकातील हार्दिकच्या पहिल्या चेंडूवर बाबरने शानदार चौकार मारला. पण हार्दिकच्या दुसऱ्या चेंडूवर फटका खेळण्याच्या नादात चेंडू बॅटची कड घेत थेट केएल राहुलच्या हातात गेला आणि भारताला पहिली विकेट मिळाली. बाबर आझम २६ चेंडूत ५ चौकारांसह २३ धावा करत माघारी परतला.

14:59 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: मोहम्मद शमी मैदानाबाहेर

पाकिस्तानने पहिल्या ५ षटकांमध्ये २५ धावा केल्या आहेत. पाचव्या षटकात मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली. पण गोलंदाजी करताना शमीच्या उजव्या पायाला त्रास होत असल्याचे दिसून आले आणि मैदानावर फिजिओदेखील आले होते. पाचव्या षटकानंतर मोहम्मद शमी मैदानाबाहेर गेला असून वॉशिंग्टन सुंदर पर्यायी खेळाडू मैदानात आला आहे. शमीची दुखापत किती मोठी आहे आणि तो पुन्हा मैदानावर येईल का याबाबत सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे.

14:40 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score:मोहम्मद शमीने टाकले ११ चेंडू

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात ११ चेंडू टाकले आहे. शमीने भारताकडून गोलंदाजीला सुरूवात केली. शमीने पहिल्याच षटकात ५ वाईड चेंडू टाकले. त्यामुळे शमीला ११ चेंडू टाकावे लागले. यासह पाकिस्तानने पहिल्या षटकात ६ धावा केल्या.

मोहम्मद शमीचे पहिले षटक

पहिला चेंडू - निर्धाव

दुसरा चेंडू - निर्धाव

वाईड

वाईड

तिसरा चेंडू - निर्धाव

चौथा चेंडू - एक धाव

पाचवा चेंडू - निर्धाव

वाईड

वाईड

सहावा चेंडू - निर्धाव

14:34 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: भारत-पाक लढतीला सुरूवात

भारत-पाकिस्तान सामन्याला सुरूवात झाली असून मोहम्मद शमीच्या हातात नवा चेंडू आहे. पहिल्याच षटकात तीन वाईड चेंडू टाकत शमीने सुरूवात केली आहे. तर पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हकची जोडी मैदानात आहे.

14:12 (IST) 23 Feb 2025

IND vs PAK Live Score: पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन

पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान न्यूझीलंडविरूद्ध पहिल्याच सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी इमाम उल हकचा संघात समावेश करण्यात आला आहे.

इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (w/c), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद

14:11 (IST) 23 Feb 2025
IND vs PAK Live Score: भारताची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्माने नाणेफेकीनंतर प्लेईंग इलेव्हन बदल केला नसल्याचे सांगितले. म्हणजेच बांगलादेशविरूद्ध जो संघ खेळवण्यात आला तोच संघ खेळताना दिसणार आहे.

पाकिस्तानविरूद्ध भारताची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

https://twitter.com/BCCI/status/1893581295684288606

India vs Pakistan Live Score Updates, ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हायव्होल्टेज लढत भारत वि. पाकिस्तान यांच्यात आज होत आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे.

१. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळत आहे. भारताने बांगलादेशविरूद्धचा पहिला सामना जिंकत स्पर्धेची विजयाने सुरूवात केली.

२. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपआपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. 

३. पाकिस्तानसाठी भारताविरूद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्धचा पहिलाच सामना गमावला आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना करो किंवा मरो आहे.