India vs Pakistan ICC Champions Trophy 2025 Live Match Updates: आयसीसी स्पर्धेतील सर्वात मोठी लढत भारत वि. पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पाचवा सामना कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आज २३ फेब्रुवारी रविवारी दुबईत होत आहे. दोन्ही संघ या लढतीसाठी सज्ज झाले आहेत. दुबईच्या मैदानावर वनडे सामन्यांमध्ये भारताचा संघ अजिंक्य आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा रेकॉर्ड भारताच्या वरचढ आहे. त्यामुळे आज कोणता संघ बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
े
India vs Pakistan Live Cricket Score Updates: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारत वि. पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
भारताच्या गोलंदाजांनी मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांच्या धावांवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. पाकिस्तानकडून रिझवानने जडेजाच्या २५व्या षटकात ५० चेंडूनंतर पहिला चौकार मारला. यासह पाकिस्तानने २५ षटकांत अवघ्या ९९ धावा केल्या आहेत.
दोन विकेट्स गमावल्यानंतर पाकिस्तान संघाच्या धावांना चांगलाच ब्रेक लागला आहे. गेले ३५ ते ४० चेंडूंमध्ये संघाने एकही चौकार-षटकार लगावलेला नाही. हार्दिक पंड्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला आहे. तर इतर सर्व गोलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली आहे. पाकिस्तानने २० षटकांत २ बाद ७९ धावा केल्या आहेत. मैदानात मोहम्मद रिझवान आणि सौद शकिलची जोडी आहे.
कुलदीप यादवला रोहित शर्माने १० वे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. पण विकेट मात्र अक्षर पटेलने मिळवून दिली. कुलदीप यादवने इमामला चेंडू टाकला आणि त्याने चेंडू समोरच्या दिशेने खेळत पटकन धाव काढण्यासाठी गेला. नॉन स्ट्राईकर एंडला असलेल्या अक्षर पटेलने लगेच धावत येऊन चेंडू टिपला आणि विकेटच्या दिशेने मारला आणि इमाम झेलबाद झाला. अशारितीने इमाम १० धावा करत बाद झाला. अशारितीने पाकिस्तानने १० षटकांत २ बाद ५२ धावा केल्या आहेत.
रनआऊटचा व्हीडिओसाठी इथे क्लिक करा
? Axar Patel’s Rocket Throw! ??
— Mukesh Rishi (@itsmukeshrishi) February 23, 2025
Brilliant piece of fielding from Axar Patel and Pakistan lose their 2nd wicket! ?⚡️ This is the energy India needs to dominate! ???
Can Team India capitalize on this early breakthrough? ??#INDvsPAK #ChampionsTrophy2025 #AxarPatel #TeamIndia pic.twitter.com/cR7ulRlDsV
भारत वि पाकिस्तान लढतीतील भारताला पहिली विकेट हार्दिक पंड्याने मिळवून दिली आहे. नवव्या षटकातील हार्दिकच्या पहिल्या चेंडूवर बाबरने शानदार चौकार मारला. पण हार्दिकच्या दुसऱ्या चेंडूवर फटका खेळण्याच्या नादात चेंडू बॅटची कड घेत थेट केएल राहुलच्या हातात गेला आणि भारताला पहिली विकेट मिळाली. बाबर आझम २६ चेंडूत ५ चौकारांसह २३ धावा करत माघारी परतला.
पाकिस्तानने पहिल्या ५ षटकांमध्ये २५ धावा केल्या आहेत. पाचव्या षटकात मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली. पण गोलंदाजी करताना शमीच्या उजव्या पायाला त्रास होत असल्याचे दिसून आले आणि मैदानावर फिजिओदेखील आले होते. पाचव्या षटकानंतर मोहम्मद शमी मैदानाबाहेर गेला असून वॉशिंग्टन सुंदर पर्यायी खेळाडू मैदानात आला आहे. शमीची दुखापत किती मोठी आहे आणि तो पुन्हा मैदानावर येईल का याबाबत सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे.
मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात ११ चेंडू टाकले आहे. शमीने भारताकडून गोलंदाजीला सुरूवात केली. शमीने पहिल्याच षटकात ५ वाईड चेंडू टाकले. त्यामुळे शमीला ११ चेंडू टाकावे लागले. यासह पाकिस्तानने पहिल्या षटकात ६ धावा केल्या.
मोहम्मद शमीचे पहिले षटक
पहिला चेंडू – निर्धाव
दुसरा चेंडू – निर्धाव
वाईड
वाईड
तिसरा चेंडू – निर्धाव
चौथा चेंडू – एक धाव
पाचवा चेंडू – निर्धाव
वाईड
वाईड
सहावा चेंडू – निर्धाव
IND vs PAK Live Score: भारत-पाक लढतीला सुरूवात
भारत-पाकिस्तान सामन्याला सुरूवात झाली असून मोहम्मद शमीच्या हातात नवा चेंडू आहे. पहिल्याच षटकात तीन वाईड चेंडू टाकत शमीने सुरूवात केली आहे. तर पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हकची जोडी मैदानात आहे.
IND vs PAK Live Score: पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान न्यूझीलंडविरूद्ध पहिल्याच सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी इमाम उल हकचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (w/c), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद
रोहित शर्माने नाणेफेकीनंतर प्लेईंग इलेव्हन बदल केला नसल्याचे सांगितले. म्हणजेच बांगलादेशविरूद्ध जो संघ खेळवण्यात आला तोच संघ खेळताना दिसणार आहे.
पाकिस्तानविरूद्ध भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव</p>
Your #TeamIndia for today ?
— BCCI (@BCCI) February 23, 2025
Updates ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/AzTW7e0PlP
भारत-पाकिस्तान सामन्याची नाणेफेक झाली असून पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की संघाला प्रथम गोलंदाजी करायची होती.
? Toss ? #TeamIndia have been put in to bowl first
— BCCI (@BCCI) February 23, 2025
Updates ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/31WGTuKFTs
दुबईत भारत-पाकिस्तान कितीवेळा आमनेसामने?
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत भारत-पाकिस्तान संघ दोनवेळा आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही लढतीत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारी बघता दुबईच्या मैदानावर भारताचं पारडं जड आहे.
भारत-पाकिस्तान पहिली वनडे केव्हा झाली होती?
भारत आणि पाकिस्तानचे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने दुबईत आमनेसामने येणार आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन संघांमध्ये पहिला वनडे मुकाबला कधी झाला होता हे तुम्हाला माहितेय का? तर या दोन संघात पहिली वनडे क्वेटा इथे १९७८ साली झाली होती.
पाकिस्तानातल्या क्वेटा इथल्या अयुब नॅशनल स्टेडियम इथे झालेल्या लढतीत भारताने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १७० धावांची मजल मारली. मोहिंदर अमरनाथ यांनी ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुरिंदर अमरनाथ यांनी ३७ तर दिलीप वेंगसरकर यांनी ३४ धावा करत त्यांना चांगली साथ दिली. पाकिस्तानतर्फे सर्फराझ नवाझने ३ तर हसन जमीलने २ विकेट्स घेतल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानला १६६ धावाच करता आल्या. माजीद खानच्या ५० धावांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. मोहिंदर अमरनाथ यांनी गोलंदाजीतही चमक दाखवताना २ विकेट्स पटकावल्या. बिशनसिंग बेदी यांनीही २ विकेट्स घेतल्या होत्या. मोहिंदर यांनाच अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
भारत-पाकिस्तान सामन्यावेळी कसं असेल तापमान?
भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना दुपारी २.३० पासून सुरू होणार आहे. सामन्यादरम्यान तापमान २६ ते ३२ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये दवाचा मुद्दा कळीचा ठरतो आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला समीकरण सोपं होत आहे. दुबईत तेवढं दव पडत नाहीये. भारत-पाकिस्तान लढतीवेळी पावसाची शक्यता नाहीये. मात्र वातावरण ढगाळ राहण्याची चिन्हं आहेत. यामुळे दमटपणा वाढू शकतो.
कसा असेल भारतीय संघ?
भारतीय संघाने सलामीच्या लढतीत बांगलादेशवर खणखणीत विजय मिळवला होता. विजयी संघात बदल करणं संघव्यवस्थापन टाळतं पण हर्षित राणाऐवजी अर्शदीप सिंगला अंतिम संघात स्थान मिळू शकतं. डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यात चुरस आहे. वरुणने नुकत्याच झालेल्या मालिकेत अफलातून कामगिरी केली होती. यशस्वी जैस्वालला वगळून वरुणला संघात स्थान देण्यात आलं. पाकिस्तानविरुद्ध वरुणास्त्र परजण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. बाकी संघात बदल होण्याची शक्यता नाही.
दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने केलेले विधान सध्या सांगलेच चर्चेत आले आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवावे अशी इच्छा या क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे. सविस्तर वातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
भारताविरुद्धचा सामना गमावल्यास पाकिस्तान गाशा गुंडाळणार?
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धची लढत भारतासाठी करो या मरो अशी आहे. सलामीच्या लढतीत पाहुण्या न्यूझीलंड संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. मोठ्या फरकाने न्यूझीलंडने विजय मिळवल्यामुळे पाकिस्तान गुणतालिकेत पिछाडीवर गेलं आहे. स्पर्धेच्या रचनेनुसार ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात ४ संघ आहेत. प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. जास्तीत जास्त सामने जिंकून बाद फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघ आतूर आहे. सर्व संघांचे समान गुण झाल्यास नेटरनरेटच्या आधारे पुढे जाणारा संघ ठरेल. पाकिस्तान याबाबतीत पिछाडीवर आहे. भारताविरुद्ध पराभूत झाल्यास पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
बाबरच्या फॉर्मची पाकिस्तानला चिंता
बाबर आझम हा पाकिस्तानच्या फलंदाजीचा आधारवड पण सध्याचा त्याचा फॉर्म काळजीत टाकणारा आहे. काही वर्षांपूर्वी सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे बाबरची विराट कोहलीशी तुलना होत असे. कोहली बॅडपॅचमधून जात असताना बाबरने केलेलं ट्वीटही व्हायरल झालं होतं. सलामीवीराच्या भूमिकेत असलेल्या बाबरला मोठी खेळी साकारण्यात अपयश येत आहे. त्याच्या स्ट्राईकरेटमुळे अन्य फलंदाजांवरचं दडपण वाढत आहे. कर्णधारपदावरून बाजूला झाल्यानंतरही बाबरच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यास बाबरला संघातून डच्चू देण्यात येऊ शकतो.
भारतीय संघाने आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध १३ पैकी १० एकदिवसीय सामने जिंकले आहेत, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने सर्वाधिक ३ सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी ही एकमेव आयसीसी टूर्नामेंट आहेत ज्यात भारताविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्ड सकारात्मक आहे.
IND vs PAK Live Score: भारत वि. पाकिस्तान
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ५व्या लढतीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्ध सामन्याने केली होती, ज्यात संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तान संघाने न्यूझीलंडविरूद्धचा सामना गमावल्याने भारताविरूद्धचा हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. हा सामना दुपारी अडीज वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
India vs Pakistan Live Score Updates, ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हायव्होल्टेज लढत भारत वि. पाकिस्तान यांच्यात आज होत आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे.
१. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळत आहे. भारताने बांगलादेशविरूद्धचा पहिला सामना जिंकत स्पर्धेची विजयाने सुरूवात केली.
२. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपआपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.
३. पाकिस्तानसाठी भारताविरूद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्धचा पहिलाच सामना गमावला आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना करो किंवा मरो आहे.