Amitabh Bachchan tweeted for Rohit Sharma’s wife Ritika Sajdeh: भारतीय कर्णधार रोहित शर्माने शनिवारी पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी केली. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात रोहित शर्मा त्याच्या हिटमॅन अवतारात दिसला होता. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते आणि टीव्हीवर सामना पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर खिळल्या होत्या, मात्र बालिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन रोहित शर्माची पत्नी रितिका हिच्या शोधात होते. याबाबत त्याने एक पोस्टही शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन शोधत होते रितिकाला –

अमिताभ बच्चन यांचे क्रिकेटवरील प्रेम कोणापासून लपलेले नाही. क्रिकेटबद्दल त्यांना किती उत्साह आणि आवड आहे, हे त्याने अनेक प्रसंगातून दाखवून दिले आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयानंतर त्यांनी एक ट्विट केले की, सामन्यादरम्यान मी टीव्हीवर रितिका सजदेहला शोधत होते.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘रोहित शर्मा, आजचा विजय अप्रतिम होता. संपूर्ण देशाला आणि स्टेडियमला ​​ते जाणवले, पण आदराने सांगावेसे वाटते की मी गर्दीत तुझ्या पत्नीचा चेहरा शोधत होतो. त्या चेहऱ्यावर खरा आनंद असतो.” रितिका अनेकदा सामन्यादरम्यान बोटे ओलांडून बसते. ही एक प्रकारची युक्ती आहे जी ती रोहितच्या फलंदाजीसाठी आणि संघाच्या विजयासाठी करते.

Sachin Tendulkar Can Play Domestic Cricket at 40 Why Cant Rohit Sharma and Virat Kohli Fans Ask Questions After Flop Show in IND vs NZ Test
IND vs NZ: “सचिन तेंडुलकर ४० व्या वर्षी…”, न्यूझीलंडविरूद्ध अपयशी ठरलेल्या रोहित-विराटला सचिनचं उदाहरण देत चाहत्यांचा तिखट सवाल
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
IND vs NZ India All Out on 156 Runs in Pune Test with Mitchell Santner First 7 Wicket Haul
IND vs NZ: भारतीय फलंदाजांची पुन्हा उडाली दाणादाण, १५६ वर टीम इंडिया ऑल आऊट; सँटनरच्या फिरकीसमोर टेकले गुडघे
Virat Kohli worst shot of his career against Mitchell Santner video viral
Virat Kohli : विराट कोहली फुलटॉसवर त्रिफळाचीत; चाहते अवाक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण,VIDEO व्हायरल
Shikhar Dhawan Shared Hilarious Video of Laddu Mutya Baba Fans React Winner of The Trend
Shikhar Dhawan: “फॅन वाले बाबा की..”, शिखर धवनलाही ‘लड्डू मुत्त्या’ ट्रेंडची पडली भुरळ, Video वर कमेंट्सचा पाऊस
Sarfaraz Khan becomes father after wife gave birth to baby boy
Sarfaraz Khan : सर्फराझ खान झाला ‘अब्बा’जान! इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
Babar Azam was advised by Virender Sehwag
Babar Azam : ‘जेव्हा तुमचा खराब काळ चालू असतो, तेव्हा…’, वीरेंद्र सेहवागने बाबर आझमला दिला महत्त्वाचा सल्ला
Rishabh Pant missed out on his seventh Test century against New Zealand
Rishabh Pant : ऋषभ पंत ठरला दुर्दैवी! अवघ्या एका धावेने हुकले ऐतिहासिक कसोटी शतक; स्टेडियमसह ड्रेसिंग रूममध्ये पसरली भयाण शांतता

सामन्याबद्दल बोलायचे, तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. भारताचा हा आठवा विजय आहे. कर्णधार रोहित शर्माने ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने सात षटकात १९ धावा देत दोन बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

हेही वाचा – ODI World Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन-विराटसह ‘या’ खेळाडूंनी पटकावलाय सामनावीरचा पुरस्कार, पाहा यादी

पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना गाठता आला नाही दुहेरी आकडा –

तत्पूर्वी, पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय इतर सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाले.