India vs Pakistan T20 Playing 11 : आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान संघामध्ये लढत होणार आहे. या लढतीत कोण सरस ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपले सर्वोत्तम खेळाडू मैदानात उतरवणार आहेत. दरम्यान, या दोन्ही संघांमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा अंदाज बांधला जात आहे. दोन्ही संघांच्या ‘प्लेइंग इलेव्हन’वरच विजय-पराभवाचे गणित ठरणार आहे.

हेही वाचा >>> Asia Cup 2022 : भारताविरोधात खेळताना पाकिस्तानी खेळाडू दंडाला बांधणार काळ्या फिती, कारणही आलं समोर

मागील काही काळापासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधातील सलामीच्या लढतीत तो काही चमत्कार करून दाखवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. केएल राहुल हादेखील नुकताच दुखापतीतून बरा झाला आहे. त्यामुळे त्यालादेखील संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. ऋषभ पंत तसेच सूर्यकुमार यादव हे खेळाडूदेखील त्यांची कमाल दाखवण्यास उत्सुक असून त्यांचा संघात समावेश निश्चित मानला जातोय. जसप्रित बुमराहच्या अनुपस्थितीत आघाडीच्या वेगवान गोलंदाजाची जबाबदारी भूवनेश्वर कुमारकडे असेल. तर फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहलकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हादेखील भारतीय संघाकडे हुकुमी एक्का आहे. त्याच्या कामगिरीकडेदेखील संघाचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा >>>IND vs PAK Asia Cup 2022 Live Update : भारत-पाक सामना विराटसाठी ठरणार खास, मैदानात उतरताच नोंदवणार ‘हा’ नवा विक्रम

पाकिस्तान संघातही भारतीय संघाच्या तोडीस तोड खेळाडू आहेत. बाबर आझमसोबतच मोहम्मद रिझवान, अष्टपैलू खेळाडू शादाब खान हे पाकिस्तानचे प्रमुख खेळाडू असतील. या संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी स्पर्धेच्या बाहेर आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा फटका मानला जातोय. त्यामुळे शाहीन आफ्रिदीची जागा कोण घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हेही वाचा >>> भारत-पाक लढतीआधी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, भारताच्या धडाकेबाज खेळाडूने घेतली निवृत्ती

भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

पाकिस्तान संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), खुशदिल शाह, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रौफ, नसीम शाह, उस्मान कादीर, शाहनवाज दहनी