Asia Cup 2023 IND vs PAK Super Four Match Updates: कोलंबोमध्ये पावसामुळे आशिया कप २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. रविवारी १० सप्टेंबर २०२३ रोजी हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता जिथे सामना थांबला होता तिथून पुढे सोमवारी सुरू होईल. राखीव दिवशीही पावसाची शक्यता आहे. कोलंबोतील पावसाने २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण करून दिली आहे, जेव्हा राखीव दिवस असूनही सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि भारत आणि श्रीलंकेला ट्रॉफी शेअर करावी लागली. सौरव गांगुली आणि रसेल अरनॉल्ड यांच्यातील लढतीसाठीही हा सामना लक्षात राहतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर, भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने आले. अंतिम सामना रोमांचक होईल, असे मानले जात होते, मात्र पावसाने कोलंबोमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात व्यत्यय आणला. फायनलमध्ये ११०.४ षटके असतानाही भारत आणि श्रीलंकेला जेतेपदावर समाधान मानावे लागले.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची सर्वोत्तम कामगिरी –

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मायदेशात असो वा परदेशात चांगली कामगिरी करत होती. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर संघाचे मनोबल उंचावले होते. लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात संघाने ३२५ धावांचे लक्ष्य गाठून नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली. यानंतर हेडिंग्ले येथील कसोटीत कठीण परिस्थितीत इंग्लंडचा डावाने पराभव केला.

हेही वाचा – Ind vs Pak: “आता मला स्वप्नातही विराट दिसतो”, वासिम अक्रमनं सांगताच किंग कोहली म्हणाला…!

दोन्ही संघ होते मजबूत –

टीम इंडिया २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. ही स्पर्धा तिसऱ्यांदा खेळवली जात आहे. आधी आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती. श्रीलंकेचा संघही खूप मजबूत होता. कर्णधार सनथ जयसूर्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्यांच्याकडे मारवान अटापट्टू, अरविंद डी सिल्वा, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारासारखे उत्कृष्ट फलंदाज होते. घरच्या खेळपट्ट्यांचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे श्रीलंकेच्या गोलंदाजांना माहीत होते.

श्रीलंकेने ५० षटकात २४४/५ धावा केल्या होत्या –

कोलंबो येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेने ५० षटकांत २४४/५ धावा केल्या होत्या. कर्णधार सनथ जयसूर्याने ७४ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. कुमार संगकाराने ८९ चेंडूत ५४ धावा केल्या. भारताकडून हरभजन सिंगने तीन, तर अजित आगरकर आणि सचिन तेंडुलकरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – सचिन,राहुल नावात असणारा रचीन रवींद्र वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचं फिरकी अस्त्र

काय झाले पहिल्या दिवशी –

२४५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर दिनेश मोंगिया आणि वीरेंद्र सेहवाग यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या दोन षटकांत भारताची धावसंख्या १४/० होती, पण कोलंबोमध्ये पावसामुळे त्या दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही. तेव्हा राखीव दिवशी पुन्हा पहिल्या चेंडूपासून सामना खेळण्याचा नियम होता. मात्र, आता सामना जिथे थांबतो, तिथून पुढे सुरू होतो.

श्रीलंकेला मिळाले होते २२३ धावांचे लक्ष्य –

राखीव दिवशी, महेला जयवर्धने (७७) आणि रसेल अर्नोल्डच्या नाबाद ५५ धावांच्या जोरावर श्रीलंकेने ५० षटकांत २२२/७ धावा केल्या. झहीर खानने डावाच्या पहिल्याच चेंडूवर जयसूर्याच्या महत्त्वाच्या विकेटसह तीन बळी घेतले. अनिल कुंबळे, हरभजन आणि आगरकर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs PAK: “माझे फक्त एकच ध्येय आहे की भारताला…”; पाकिस्तानविरुद्धच्या अर्धशतकानंतर शुबमन गिलने केला खुलासा

राखीव दिवशीही पावसाने सामना गेला वाया –

दिनेश मोंगियाच्या रूपाने भारताला सुरुवातीचा धक्का बसला. चामिंडा वासने दिनेश मोंगियाला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फायनलमध्ये पुन्हा पाऊस येण्यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सेहवागने दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली होती. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर ३८ धावा होती. संघ मजबूत स्थितीत होता, मात्र पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. भारत आणि श्रीलंका यांना चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak match in the asia cup was reminiscent of the india vs sri lanka match in 2002 vbm