Pakistan playing Eleven announced for match against India: आशिया चषका २०२३ च्या सुपर-4 फेरीतील तिसरा सामना रविवारी (१० सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघांत होणार आहे. उभय संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. २ सप्टेंबर रोजी गट फेरीतील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यासाठी पाकिस्तानने आपला प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बाबर आझमने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळलेल्या संघात एकही बदल केलेला नाही.
पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा एका खेळाडूंची निवड केला आहे, जो पाच वर्षांनंतर भारताविरुद्ध वनडेमध्ये खेळणार आहे. कँडी येथे दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अष्टपैलू फहीम अश्रफ संघात नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात त्याला संधी मिळाली आणि आता तो पुढच्या सामन्यातही खेळणार आहे. तो २०१८ नंतर प्रथमच टीम इंडियाविरुद्ध वनडे सामना खेळणार आहे. तेव्हा त्याने आशिया कपच्या सामन्यात त्याने ३१ धावा केल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती.
पाकिस्तानने सुपर 4 मधील पहिला सामना जिंकला –
सुपर 4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध खेळला. त्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला होता. भारत सुपर 4 चा पहिला सामना रविवारी खेळणार आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्येही भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते, मात्र तो सामना पावसामुळे रद्द झाला होता. ज्यामध्ये पाकिस्तानचा संघ फलंदाजी करता आली नव्हती. भारताने ४९ षटके फलंदाजी केली होती.
हेही वाचा – SA vs AUS 2nd ODI: डेव्हिड वॉर्नरने २०वे शतक झळकावत मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
हेही वाचा – SL vs BAN: श्रीलंकेने बांगलादेशसमोर ठेवले २५८ धावांचे लक्ष्य, सदिरा समरविक्रमाने खेळली ९३ धावांची खेळी
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.