India vs Pakistan, World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बर्यापैकी संघांनी आपले प्रत्येकी दोन सामने खेळले आहे. या स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांत खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे. या दोन्ही संघातीलभारतीय भूमीवरील सामन्यांबद्ल बोलायचे, तर एकदिवसीय फॉर्मेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही सामना जिंकण्यात यश आलेले नाही.

पाकिस्तानने भारतीय भूमीवर भारताविरुद्ध जिंकलेत अधिक सामने –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर एकूण ३० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने १९ सामने जिंकले आहेत, तर भारताने ११ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धचा विक्रम भारतीय भूमीवर अधिक चांगला दिसतो.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
IND vs PAK Hockey India beat Pakistan by 2 1 in Asian Champions Trophy and Enters SemiFinal
IND vs PAK Hockey: भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय अन् सेमीफायनलमध्ये मारली धडक, कर्णधार हरमनप्रीत सिंहचे दोन दणदणीत गोल
Moin Khan strong warning to BCCI Team India
IND vs PAK : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आला नाही तर…’, मोईन खानने दिला इशारा
Why is Afganistan Playing Home Matches in India
AFG vs NZ: अफगाणिस्तानचा संघ घरच्या मैदानावरील सामने भारतात का खेळतो? न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका नोएडामध्ये होणार
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं

एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यात टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. १९९६ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय भूमीवर खेळला गेला होता, ज्यामध्ये पाकिस्तान संघाचा पराभव झाला होता. या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ येथे दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर सामना रंगण्याची ही तिसरी वेळ असेल.

हेही वाचा – NZ vs BAN, World Cup 2023: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान संघाला कमी लेखता येणार नाही. या संघाचा कर्णधार बाबर आझमची कामगिरी चांगली नसली, तरी इतर फलंदाज मात्र आपले काम चोख बजावत आहेत. या टीममध्ये मोहम्मद रिझवानच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्ध विक्रमी धावांचे आव्हान गाठले गेले. साहजिकच रोहित शर्माच्या संघाला पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनीही आपले पहिले दोनही सामने जिंकले आहेत.