ICC Women’s World Cup-2022: महिला विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडियाची आघाडीची कर्णधार मिताली राजने रविवारी क्रिकेटच्या इतिहासात तिचे नाव कोरले. २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणारी मिताली, आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२२ वर्षांपूर्वी पहिला सामना

माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल येथे आयसीसी महिला विश्वचषकाच्या ४ क्रमांकाच्या सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सलामी दिली तेव्हा मितालीने ऐतिहासिक कामगिरी केली. खेळाच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक, मितालीने २२ वर्षांपूर्वी प्रथमच शोपीस स्पर्धेत भाग घेतला होता. मिताली न्यूझीलंडने आयोजित केलेल्या विश्वचषकाच्या २००० हंगामात खेळलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग होती.

(हे ही वाचा: महाकाय अजगराचा रस्ता ओलांडतानाचा Video Viral; नेटीझन्स म्हणतात असे दृश्य कधीच पहिले नाही)

मितालीच्या कारकिर्दीतील सहावा विश्वचषक

दोन दशकांहून मिताली कारकिर्दीतील सहावा विश्वचषककाळानंतर, टीम इंडियाची कर्णधार म्हणून मिताली तिच्या विक्रमी सहाव्या विश्वचषक मोहिमेसाठी न्यूझीलंडला गेली. मितालीही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत एलिट लिस्टमध्ये सहभागी झाली आहे. महान क्रिकेटपटू तेंडुलकरने टीम इंडियासाठी आपल्या कारकिर्दीत सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. २०११ च्या सीजनमध्ये टीम इंडियाने विश्वचषक ट्रॉफी जिंकली आणि तोच दिवस तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक होता.

(हे ही वाचा: Viral Photo:…तोपर्यंत लग्न करणार नाही, विराटसाठी चाहत्याने घेतला मोठा निर्णय)

वर्ल्डकपचा प्रवास

भारताचे प्रतिनिधित्व करण्याबद्दल बोलताना, भारतीय कर्णधार मिताली म्हणाली की, “न्यूझीलंडमध्ये २००० च्या विश्वचषकानंतर मी खूप पुढे आले आहे. टायफॉइडमुळे मी तो विश्वचषक गमावला, पण आता मी इथे आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak mithali raj equals sachin set a unique world cup record ttg