IND vs PAK Updates In Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वात रोमांचक सामना दुबईत खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्तानचे आमनेसामने आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबर आझम आणि इमाम उल हकची जोडी मैदानावर फलंदाजी करत असून तर मोहम्मद शमीने भारताच्या गोलंदाजीला सुरूवात केली. पण यादरम्यान मोहम्मद रिझवान हातात माळ घेऊन बसलेला पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानने बाबर आझम आणि इमाम उल हक यांच्या भागीदारीसह चांगली सुरूवात केली. बाबर आझमने कमालीचे कव्हर ड्राईव्ह आणि फ्लिक शॉट खेळत चौकार मारले होते. पण फटका मारण्याच्या नादात तो हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर केएल राहुलकरवी झेलबाद झाला. तर इमाम उल हक देखील चांगला खेळत होता. पण कुलदीपच्या षटकात तो अक्षर पटेलच्या उत्कृष्ट थ्रो वर धावबाद झाल्याने पाकिस्तानला धक्के बसले.

तत्पूर्वी पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. यादरम्यान मोहम्मद रिझवान स्क्रिनवर दिसला. तेव्हा रिझवान हातात माळ घेऊन जप करत होता. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वहाब रियाज कॉमेंट्री करत होता, तेव्हा त्याने सांगितले की, तो कलमा पठण करत आहे, जे मुस्लिम लोकांमध्ये पठण केले जाते. मोहम्मद रिझवानच्या पठणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. याआधी अमेरिकेच्या दौऱ्यातही रिजवान मौलवीप्रमाणे बोलताना दिसला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानी संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात किवी संघाने पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला. यानंतर भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवणे महत्त्वाचे झाले आहे. जर पाकिस्तानने हा सामना गमावला तर ते चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणार हे निश्चित आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव</p>

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन

इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार/यष्टीरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद