Ind Vs Pak : रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक शत्रूंचा जो क्रिकेट सामना पार पडला त्यात भारताने अत्यंत संयमी खेळी करत पाकवर सहा गडी राखून विजय मिळवला. चँपियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली. भारताने सामना खिशात घातल्यानंतर अबरार अहमद या खेळाडूवर भारतीय सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका करत आहेत. या खेळाडूने जे वर्तन केलं ते भारतीय क्रिकेट रसिकांना मुळीच आवडलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं मैदानात?

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांनी २४१ धावांचं लक्ष्य गाठत असताना या दोघांनी ६९ धावांची भागिदारी केली. मात्र १०० धावा पूर्ण झालेल्या असताना शुबमन गिल अबरार अहमदच्या चेंडूवर बाद झाला. ज्यानंतर आपली एक भुवई तिरकसपणे उंचावून अबरारने शुबमन गिलला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. मैदानात त्याने केलेली ही कृती कॅमेरात कैद झाली. यानंतर आता अबरारला लोक चांगलेच ट्रोल करत आहेत. अबरारने अशा पद्धतीने चेंडू फेकला की तो शुबमनला किंवा कुणालाही कळलाच नसता. त्याच्या खेळीचं कौतुक होत असतानाच त्याच्या कृतीने मात्र भारतीय फॅन्स चांगलेच संतापले. आता अबरारला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.

काय म्हणत आहेत नेटकरी?

विराट कोहलीने जे शतक केलं तो फोटो जोडत एकाने म्हटलं आहे प्रिन्स को ट्रोल करने से पहले किंग से बात कर. विराट कोहलीला किंग कोहली म्हटलं जातं. त्याने शतकी खेळी करत या सामन्याला चार चाँद लावले. हेच उदाहरण आता लोकांनी अबरारला दिलं आहे. काही जणांनी त्याला शिव्याही दिल्या आहेत तसंच अबरारचा हा काय इशारा होता? असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. एका नेटकऱ्याने फोटो पोस्ट केला आहे ज्यात एक माणूस चपलांच्या ढिगावर उभा आहे. हा अबरार अहमद असून तो मॅच संपल्यावर आपला कमेंट बॉक्स पाहतो आहे असंही या नेटकऱ्याने म्हटलं आहे. अबरार अहमदच्या कृतीविरोधात प्रचंड संताप व्यक्त होताना दिसतो आहे. काही नेटकऱ्यांनी त्याला आता तुझी भुवई कापून टाक असाही इशारा देत ठणकावलं आहे.

टीम इंडियाचा जबरदस्त विजय

भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा २४२ धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय जबरदस्त पद्धतीने पूर्ण केले. टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार विराट कोहली होता, ज्याने उत्कृष्ट शतक झळकावून आपल्या पुनरागमनाचा डंकाही वाजवला आहे.