Ashwin Retaliates After Javed Miandad’s Threat: आशिया चषक स्पर्धेवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन असे मानतो की या वर्षाच्या शेवटी भारतात होणारी ही ५० षटकांच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खूप मोठी असून त्यावर बहिष्कार टाकण्याचे धाडस पाकिस्तानकडे नाही. गेल्या काही दिवसांपासून हा विषय खूप अधिक चिघळत चालला असून बैठकांचे सत्र सुरु आहे.

BCCI ने आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानात न जाण्याचे सांगितले, तेव्हापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने आदल्या दिवशी बीसीसीआयबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केले होते, आता रविचंद्रन अश्विनने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. रविचंद्रन अश्विन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतात येण्यासाठी अनेकवेळा नकार दिला आहे असे आपण ऐकतो. तेव्हा अनेकदा असे घडते की स्पर्धा बाहेर कुठेतरी हलवावी लागते.अशावेळी नेहमी तो दुबईला पोहचतो. अश्विन म्हणाला की, “यावेळी आशिया चषक श्रीलंकेत हलवावा, कारण प्रत्येक वेळी तो दुबईला पोहोचतो.”

George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा: On This Day: जेव्हा पाकिस्तानची होते पळताभुई थोडी…; जंबोच्या तुफान पराक्रमाची गाथा सांगणारा video खुद्द BCCIने च केला शेअर

आशिया चषक २०२३ श्रीलंकेत होऊ शकतो

अश्विन म्हणाला, “अनेकदा असे हे घडताना आपण अनेकदा पाहिलं असेल. आम्ही त्यांच्या जागेवर जाणार नाही, असे म्हटल्यावर तेही आमच्या जागेवर येणार नाहीत, असे म्हणतील. त्याचप्रमाणे पाकिस्तानने विश्वचषकासाठी भारतात येणार नसल्याचे सांगितले आहे, पण मला वाटते की ते शक्य नाही.आशिया चषक २०२३चे ठिकाण श्रीलंकेत हलवले जाऊ शकते असेही अश्विनने सांगितले.”

रविचंद्रन अश्विनचे जावेद मियाँदादला चोख प्रत्युतर

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची ही प्रतिक्रिया जावेद मियाँदादच्या विधानानंतर आली आहे, ज्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार म्हणाला होता की, “जर भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला आला नाही तर तो नरकात जाऊ देत आपण आपले आपले खेळू.” यावर पुढे बोलताना अश्विन म्हणाला, “आशिया चषक श्रीलंकेला नेण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. ५० षटकांच्या विश्वचषकासाठी हा महत्त्वाचा पुढाकार असू शकतो. दुबईमध्ये अनेक स्पर्धा झाल्या आहेत. श्रीलंकेला नेले तर मलाही आनंद होईल.”

हेही वाचा: ILT20 2023: ‘काट्याचा नायटा म्हणतात ते असं!’ कॅच पकडायला गेला अन् थेट स्ट्रेचरवर बसून रुग्णालयात, Video व्हायरल

एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने पाकिस्तानला जाणार नसल्याचा पुनरुच्चार

या आठवड्याच्या सुरुवातीला बहारीन येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पाकिस्तानला जाण्यास भारताच्या नकाराचा पुनरुच्चार करण्यात आला. बीसीसीआयने पाकिस्तानला जाण्यास नकार देण्याचे कारण म्हणजे ‘भारत सरकारकडून मंजुरी’ मिळणार नाही. पुढील महिन्यात समितीची पुन्हा बैठक होईल तेव्हा एसीसी यजमान आणि स्थळ याविषयी चर्चा करेल.

Story img Loader