IND U19 vs PAK U19 Match Updates in Marathi: अंडर-१९ आशिया चषक २०२४ ला २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज ३० नोव्हेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान अंडर-१९ संघांमध्ये आशिया कपचा मोठा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हकचा मुलगाही खेळत आहे. ज्याने गोलंदाजीत चकमदार कामगिरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ७ बाद २८१ धावा करत भारतासमोर २८२ धावांचे मोठे लक्ष्य दिले. या सामन्यात पाकिस्तानकडून मिसबाह उल हकचा मुलगा फहाम उल हक याने पदार्पण केले. अष्टपैलू खेळाडू असलेला फहाम उल हक फलंदाजीत काही मोठी कामगिरी करू शकला नाही.

हेही वाचा – IND vs PAK: शाहजेब खानचे झंझावाती शतक अन् रचला विक्रम, U19मध्ये भारताविरूद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच पाकिस्तानी फलंदाज

पाकिस्तानने शाहजेब खानच्या शानदार शतकाच्या (१५९) बळावर मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकचा मुलगा फहम उल हकने फलंदाजीत चमकदारी कामगिरी केली नाही. तो ७ चेंडू खेळून केवळ ४ धावा करून बाद झाला. पण गोलंदाजीत मात्र फहामने सर्वांना प्रभावित केले. फहम उल हकने ३६ षटकांचा सामना होईपर्यंत एकूण ८ षटके टाकली आहेत, ज्यामध्ये त्याने ४१ धावा देत २ विकेट्स घेतले.

हेही वाचा – VIDEO: मुंबईचा राजा रोहित शर्मा! ऑस्ट्रेलियात चाहत्यांकडून घोषणाबाजी, हिटमॅनच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष

फहामने आंद्रे सिद्धार्थला १५ धावांवर झेलबाद केले. तर किरण चोरमुलेला २० धावांवर क्लीन बोल्ड केले. पाकिस्तानचा दिग्गज मिस्बाह उल हकचा १८ वर्षीय लेक हा फहम उल हक हा अष्टपैलू खेळाडू आहे. फहम उल हक मोठमोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. मात्र भारताविरुद्ध त्याला ही कामगिरी करता आली नाही. त्याला किरण चोरमुलेने बाद केले.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का, ‘हा’ मुख्य खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर; बदली खेळाडूची घोषणा

मिसबाह उल हक हा पाकिस्तानी संघाचा सर्व फॉरमॅटमध्ये माजी कर्णधार राहिला आहे. मिसबाह उल हकच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तान संघाने २०१२ मध्ये आशिया चषकाचे जेतेपद पटकावले होते. याचबरोबर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मिसबाहने राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद म्हणून काम केले आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय संघाचे मुख्य निवडकर्ता ही भूमिकाही त्यांनी पार पाडली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak pakistan former captain misbah ul haq son faham ul haq playing against india in u19 asia cup 2024 took 2 wickets bdg