India vs Pakistan, Asia Cup 2023: शाहीन आफ्रिदीने आशिया चषक २०२३च्या मोहिमेची सुरुवात दमदार कामगिरीने केली. नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने डावाच्या पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत नेपाळच्या फलंदाजीला दडपण आणले होते. ३४३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळने पहिल्याच षटकात दोन गडी गमावले. यानंतर संघाला परतता आले नाही. अखेर पाकिस्तानने हा सामना २३८ धावांनी जिंकला. मात्र, या विजयानंतरही पाकिस्तानचे चाहते थोडे चिंतेत दिसले. कारण, नेपाळच्या डावाच्या १०व्या षटकात शाहीन आफ्रिदीला दुखापत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पोर्ट्स स्टाफ फिजिओच्या मदतीने आफ्रिदीला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याने यावर्षी पाकिस्तान सुपर लीगद्वारे पुनरागमन केले. शाहीन आफ्रिदी २०२२ टी२० विश्वचषकापासून गुडघ्याच्या दुखापतीशी झगडत होता. अशा स्थितीत त्याला फिजिओसोबत मैदान सोडताना पाहून पाकिस्तानी चाहते काळजीत पडले. आफ्रिदीला दुखापत का झाली? हे जरी स्पष्ट झाले नसले तरी त्याची दुखापत पाकिस्तानसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.

पाकिस्तानचा पुढचा सामना आशिया कपमध्ये भारताविरुद्ध आहे आणि शाहीन हा पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचा कणा मानला जातो. त्याच्याशिवाय नसीम शाह आणि हारिस रौफ हेही आहेत. पाकिस्तानचे हे त्रिकुट विरोधी संघासाठी खूप धोकादायक आहेत. आफ्रिदीने मैदान सोडल्यानंतर समालोचक अँडी फ्लॉवर आणि वकार युनूस देखील चिंतेत दिसले, कारण आफ्रिदी सीमारेषेजवळ उभा होता आणि संघाचे डॉक्टर त्याच्याशी बोलत होते. फ्लॉवर म्हणाले, “जर आफ्रिदीची काही अडचण असेल तर त्याने ती दूर करावी. पाकिस्तान संघासाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने तंदुरस्त असणे गरजेचे आहे.”

हेही वाचा: R. Ashwin: आर. अश्विनचे पाकिस्तान संघाबाबत आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “आशिया चषक आणि विश्वचषकात ते…”

दरम्यान, वकार युनूस शाहीन आफ्रिदीच्या तंदुरुस्तीबद्दल अधिक चिंतित होता. स्वत: एक माजी वेगवान गोलंदाज असल्याने, पाकिस्तानच्या या दिग्गजाने त्याच्या दुखापतीच्या कारणांवर जोर दिला. त्याच्यामते फिजिओ आणि डॉक्टर दोघेही वेगवान गोलंदाजाच्या आसपास असल्यास पाकिस्तानसाठी ते खरोखरच चिंतेचे कारण असू शकते. वकार म्हणाला, “फिजिओने फास्ट बॉलरला थर्ड मॅन किंवा फाईन लेगवर ठेवण्यास माझा आक्षेप नाही. पण डॉक्टर आल्यावर थोडी काळजी वाटते. शाहीन हा पाकिस्तानसाठी आगामी मोठ्या मालिका आणि सामने पाहता खूप गरजेचा खेळाडू आहे. खासकरून विश्वचषक आणि आशिया चषक यामध्ये त्याने चांगली कामगिरी करून पाकिस्तान ट्रॉफी जिंकून द्यावी.”

नेपाळ विरुद्धच्या सामन्यात काही षटकांनंतर शाहीन आफ्रिदी मैदानात परतल्याने पाकिस्तान संघाला दिलासा मिळाला. “डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने मुलतानच्या दमट हवामानाच्या परिस्थितीत सलग पाच षटके टाकली आणि त्याला क्रॅम्पचा त्रास झाला. शरीरातील पाणी कमी झाले की असा त्रास होतो. कारण, त्या परिस्थितीत सतत घाम येत राहतो त्यामुळे पायात गोळे येतात. त्यासाठी काही जण लिंबू पाणी किंवा मीठ पाणी सतत पीत राहतात,” असे वसीम अक्रम त्याच्या मागील स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा: PAK vs NEP: अवघ्या २३.४ षटकात नेपाळचा खुर्दा; आशिया चषकात पाकिस्तानची विजयी सलामी, तब्बल २३८ धावांनी दणदणीत विजय

शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीशी झुंजत आहे

दुखापतींच्या समस्येने पाकिस्तान संघावर परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आशिया चषक २०२२च्या तयारीत शाहीन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत होता, ज्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. २०२२च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याने पुनरागमन केले असताना, स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याची दुखापत पुन्हा उफाळून आली. दोन षटके टाकल्यानंतर तो जखमी झाला आणि त्याच्या दुखापतीचा इंग्लंडच्या विजयात मोठा वाटा होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak pakistan worries ahead of india match star bowler shaheen shah afridi injured in match against nepal avw