Asia Cup 2022 IND vs PAK: आशिया चषक मधील भारत- पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात भारताचा आक्रमक खेळाडू ऋषभ पंत याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आज पुन्हा एकदा हे कट्टर संघ आमनेसामने येणार असताना पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज व मुख्य प्रशिक्षक वकार युनिस यांनी ऋषभ पंत याची पाठराखण केली आहे. दिनेश कार्तिकची यष्टिरक्षक म्हणून तर केएल राहुल आणि विराट कोहली परतल्यामुळे पंतसाठी जागा नव्हती हे बघून आश्चर्य वाटल्याचे युनिस यांनी म्हंटले. दरम्यान आजच्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत परतला आहे.
भारत पाकिस्तान सामन्याच्या आधी यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडिओमध्ये पत्रकार विमल कुमार यांच्याशी बोलताना, युनिस यांनी ऋषभ पंत हा भारताचा हुकुमी एक्का आहे असे म्हंटले. जर भारताला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी पंतला टॉप ऑर्डरमध्ये समाविष्ट करायला हवे जेणेकरून त्याला पॉवरप्लेमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
“भारताने ऋषभ पंतसारखा खेळाडू बेंचवर बसवलेला पाहून आम्हाला सर्वांनाच धक्का बसला मला वाटते की तो वरच्या फळीत सर्वात योग्य आहे. जेव्हा क्षेत्ररक्षणावर बंधने असतात अशा परिस्थितीत ऋषभ पंतसारखा धोकादायक कोणी नाही.
याशिवाय भारतीय कर्णधारपदाचा रोहित शर्माच्या फलंदाजीवर परिणाम झाला आहे अशा चर्चांवर सुद्धा युनिस यांनी उत्तर दिले आहे. रोहित कोणत्याही वाईट फॉर्ममध्ये नाही. रोहित लवकरच मोठी धावसंख्या करेल असा विश्वासही युनिस याने व्यक्त केला आहे. (Asia Cup IND vs PAK: पहिल्या १२ धावांमध्येच रोहित शर्माच्या नावे झाला ‘हा’ विश्वविक्रम, १० मिनिटात केली मोठी कामगिरी)
“प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो, पण जो कोणी रोहित खराब फॉर्ममध्ये असे कोणी म्हणत असेल तर, गोलंदाज म्हणून आम्हीही खराब फॉर्ममध्ये गेलो होतो. तो वाईट खेळत नाही पण काहीवेळा तुम्ही योग्य शॉट्स नीट बजावू शकत नाही आणि त्यामुळेच तुम्ही बाद होतात. पण मला तो एक नेतृत्व आणि फलंदाज म्हणून तो मला खूप आवडतो”, असेही युनिस याने म्हंटले आहे.