Shoaib Akhtar on Rohit Sharma: शाहीन आफ्रिदीला नव्या चेंडूने समजून घेण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला खूप संघर्ष करावा लागेल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे मत आहे. शनिवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पावसामुळे विश्रांतीनंतर रोहितला आफ्रिदीने इनबाउंड चेंडूवर बाद केले. पावसामुळे हा सामना जरी रद्द झाला असला तरी विराट कोहली आणि रोहित शर्मा ज्या पद्धतीने बाद झाले त्यावर क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२१च्या टी२० विश्वचषकात जेव्हा दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा डावखुरा वेगवान गोलंदाजाच्या इनस्विंग यॉर्करवर बाद झाला होता. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध रोहितचा आधीच खराब रेकॉर्ड आहे आणि शाहीन आफ्रिदी सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याने त्याच्या विरोधात खेळताना थोडीशी अडचण होत आहे. त्याच मुद्द्यावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठे विधान केले.

आफ्रिदीच्या विरोधात रोहितच्या समस्यांचे मूल्यांकन करताना, अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले, “मला वाटत नाही की रोहित शाहीनचे चेंडू अजिबात वाचू किंवा समजू शकेल. शाहीन आफ्रिदीचे चेंडू त्याला अजिबात कळत नाहीत. रोहित शर्माचा अशा प्रकारे आऊट होण्याचा दृष्टीकोन अजिबात चांगला नव्हता, तो यापेक्षा खूप चांगला खेळाडू आहे. रोहितने याआधी चांगली फलंदाजी करून दाखवली असून, मला वाटते की तो शाहीनच्या गोलंदाजीची खूप काळजी करत आहे. त्याने डावखुऱ्या गोलंदाजीविरोधात नेट्समध्ये खूप सराव केला आहे. मात्र, त्याला अजूनही इनस्विंग आणि आउटस्विंग ओळखण्यात अपयश येत आहे. त्याला शाहीनचा चेंडू रिलीज करताना हात ओळखता येत नाहीये.”

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकपसाठी लवकरच टीम इंडियाची होणार घोषणा, राहुलचे स्थान निश्चित! सॅमसनबाबत सस्पेन्स कायम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द झाला असून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळवावा लागला. यासह पाकिस्तानचे दोन सामन्यांत एकूण तीन गुण झाले आहेत. यापूर्वी नेपाळविरुद्धचा पहिला सामना जिंकून त्यांना दोन गुण मिळाले होते. ते सुपर फोरसाठी पात्र ठरले आहेत. भारताला आता एक गुण मिळाला आहे आणि सुपर फोर टप्प्यात जाण्यासाठी आजच्या सामन्यात नेपाळला पराभूत करावे लागेल. त्यामुळे नेपाळविरुद्धचा आजचा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.

भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात काही झाले?

आशिया कपमध्ये भारताचा दुसरा सामना नेपाळशी आहे. नेपाळच्या संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी भारताचा पाकिस्तानसोबतचा पहिला सामना पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि नेपाळमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल. मात्र, नेपाळसाठी भारताला हरवणे अत्यंत कठीण असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: Gautam Gambhir: “मी नव्हे तर हरभजनने जिंकवली होती मॅच…”, धोनीबाबत गंभीरचा ‘यू-टर्न’; सोशल मीडियावर झाला ट्रोल

पावसामुळे सध्या खेळ थांबला आहे. नेपाळची धावसंख्या ३७.५ षटकांनंतर सहा विकेट्सवर १७८ धावा आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजला दोन आणि शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. नेपाळकडून आसिफ शेखने सर्वाधिक ५८ धावा केल्या आहेत. कुशल भुरटेल ३८ धावा करून बाद झाला. दीपेंद्र २० चेंडूत २७ तर सोमपाल २० चेंडूत ११ धावांवर खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak rohit sharma is not able to read shaheen at all shoaib akhtars comment on the indian captain avw
Show comments