Shaheen Afridi Second Time Wedding: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा हिच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आशिया चषक २०२३ च्या फायनलनंतर २ दिवसांनी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी हे जोडपे पाकिस्तानमध्ये दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत.

शाहीन सध्या सुरू असलेल्या आशिया चषक २०२३ मधील सुपर ४ सामन्यांसाठी श्रीलंकेत आहे. २३ वर्षीय शाहीन हा सध्या आशिया चषकामध्ये तीन सामन्यात ७ विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही आपण भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाहिली आहे.भारताच्या धडाकेबाज फलंदाजना अवघ्या ३५ धावा देत त्याने ४ बळी घेतले होते. पावसाने सामन्यात अडथळा आणला नास्ता तर ही मॅच पाकिस्तानने खिशात घातली असती असं म्हणायला हरकत नाही.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

आता पुन्हा एकदा १० सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. यात पाकिस्तान आफ्रिदीच्या खेळाकडे लक्ष लावून असेल तर भारतीय फलंदाजांना यावेळेस आफ्रिदीच्या गोलंदाजीला चकवा देता येतोय का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाकिस्तान यंदा फायनलपर्यंत जाण्याच्या तयारीतच आले असल्याचे म्हणता येईल कारण त्यानुसारच आफ्रिदीने आपल्या दुसऱ्यांदा होणाऱ्या लग्नाच्या तारखा ठरवल्या आहेत.

शाहीन आफ्रिदी आणि अंशाचे पहिले लग्न याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाले होते. यावेळी निकाह सोहळ्यात बाबर आझम आणि शादाब खान यांच्यासह फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. मात्र, या जोडप्याला आता त्यांचे लग्न मोठ्या थाटात साजरे करायचे आहे आणि म्हणून दुसरे लग्न करण्याचा घाट घालण्यात येणार आहे.

हे ही वाचा<< Asia Cup: “रोहित शर्माचा बॉडी डबल खेळतोय, शाहीन त्याला..”, शोएब अख्तरचं IND vs PAK आधी मोठं विधान

दरम्यान, दुसऱ्या IND vs PAK या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. संपूर्ण सामना होण्यासाठी, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) सुपर 4 सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्याशिवाय राखीव दिवस असणारा हा एकमेव सामना आहे. हवामानाच्या अंदाजानुसार सामन्याच्या दिवसात मुसळधार पावसाची सूचना दिल्यानंतर खेळण्याच्या स्थितीत बदल करण्यात आला. विशेष म्हणजे मुसळधार पावसाचा अंदाज असूनही सुपर ४ सामने कोलंबोमधून न हलवल्याबद्दल ACC अध्यक्ष जय शाह यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

Story img Loader