Shubman Gill scored 1571 runs in 30 innings in odi surpassing many Indian legends: आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान संघात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पावसामुळे खेळ थांबवण्यापूर्वी २४.१ षटकानंतर २ बाद १४७ धावा केल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शुबमन गिलने आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. वनडे फॉरमॅटमधील या संघाविरुद्धचे हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. यासोबतच त्याने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीही साकारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात गिल चांगलाच फॉर्मात होता, पण शाहीन आफ्रिदीने त्याला आपल्या स्लोअर बॉलने फसवले आणि तो झेलबाद झाला. पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या या खेळीने गिलने भारतीय दिग्गजांना मागे टाकले. या सामन्यात गिलने ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. तसेच रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची शतकी भागीदारी केली.

शुबमन गिलने भारतीय दिग्गजांना टाकले मागे –

शुबमन गिलचा हा ३०वा एकदिवसीय सामना होता आणि आतापर्यंत त्याने या सामन्यांच्या ३० डावांमध्ये १५७१ धावा केल्या आहेत. भारताकडून वनडेमध्ये पहिल्या ३० डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल आता पहिल्या स्थानी आला आहे. त्याने श्रेयस अय्यर, शिखर धन, नवज्योत सिंग सिद्धू, केएल राहुल, विराट कोहली आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले.

हेही वाचा – IND vs PAK: १४ धावा करताच केएल राहुलने केला खास पराक्रम, वनडेत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय फलंदाज

भारतासाठी पहिल्या ३० डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यर १२९९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर शिखर धवन १२३१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नवज्योत सिंग सिद्धू चौथ्या स्थानावर आहे, ज्याने १२०७ धावा केल्या होत्या, तर केएल राहुल ११२७ धावांसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर एमएस धोनीने सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs PAK: रोहित शर्माने पहिल्या षटकात षटकार मारत मोडल पॉल स्टर्लिंगचा विक्रम, सचिन-सेहवागच्या ‘या’ यादीत झाला सामील

वनडेच्या पहिल्या ३० डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप ७ भारतीय फलंदाज –

१५७१ धावा – शुबमन गिल<br>१२९९ धावा – श्रेयस अय्यर
१२३१ धावा – शिखर धवन
१२०७ धावा – नवज्योत सिद्धू
११२७ धावा – केएल राहुल
१०९० धावा – विराट कोहली
१०५६ धावा – एमएस धोनी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak shubman gill scored 1571 runs in 1st 30 innings in odi surpassing many indian legends vbm
Show comments