IND vs PAK T20 Asia Cup 2022: आशिया चषक मालिकेतील बहुप्रतीक्षित सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान. यंदा २८ ऑगस्टला हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या या सामन्यासाठी केवळ दोन्ही देशातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कोणता संघ चॅम्पियन होणार हे सांगितले आहे. यापूर्वी २०२१ मध्ये T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता त्यामुळे आता वॉटसन याचे भाकीत खरे होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेन वॉटसनने नेमकं काय सांगितलं?

शेन वॉटसनने स्टार स्पोर्ट्सच्या अँकर संजना गणेशनशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय संघ ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी होईल. पहिला सामना खूप महत्त्वाचा असेल. सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तानला पूर्ण विश्वास आहे की ते भारतीय संघाचा यंदा पराभव करू शकतील. या पहिल्या सामन्यात जो संघ जिंकेल तो आशिया कप जिंकू शकेल. पाकिस्तान जरी पूर्णपणे खात्रीशीर असला तरी आपल्याला भारत जिंकेल असं मनापासून वाटत असल्याचे सुद्धा वॉटसनने सांगितले आहे.पाकिस्तानी गोलंदाजांच्या विरुद्ध भारताची फलंदाजी आक्रमक राहिल्यास भारताचा विजय निश्चित होऊ शकतो .

आजवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व दिसून आले आहे. आशिया चषकात आतापर्यंत भारत- विरुद्ध पाकिस्तान असे १४ सामने झाले असून यात आठ सामने भारताने तर ५ सामने पाकिस्तानने पटकावले होते. भारताने आजवर ७ वेळा तर पाकिस्तानने दोन वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.

Asia Cup 2022: आशिया चषकामध्ये भारतीय फलंदाजांचा ‘हा’ विक्रम यंदाही राहणार कायम? आजवर एकदाही…

यंदा रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा संघाचा भाग असणार आहे. हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूंसह रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या क्रिएकटपटुंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.