आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये ऋषभ पंतला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंतऐवजी दिनेश कार्तिकला विकेटकिपर म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी सामना सुरु झाल्यापासून पंत सोशल नेटवर्किंगवर चर्चेत असल्याचं चित्र पहायला मिळालं. याचं मुख्य कारण ठरलं अभिनेत्री उर्वशी रौतेला. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु असताना आज उर्वशी भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना पाहण्यासाठी दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हजर आहे. उर्वशीला मैदानात पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं मैदानात असणं आणि पंतने सामना न खेळणं याचा संबंध जोडला आहे. (येथे क्लिक करुन पाहा लाइव्ह अपेडेट्स)
दोघांमधला वाद काय?
क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. गेल्या काही दिवसांत दोघांनी एकमेकांची थेट नावं न घेता अनेक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केल्या. ‘आरपी’ नावाचा क्रिकेटपटू मला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबायचा, असा दावा उर्वशीने केला. तिथपासूनच उर्वशी-ऋषभ यांच्यामधील वादाला सुरुवात झाली. आज उर्वशीने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे. २०१८ मध्ये ऋषभ आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. मात्र सोशल मीडियाद्वारे सुरू असलेल्या वादामुळे नक्कीच त्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध होता, अशी चर्चा पुन्हा रंगू लागली.
आज उर्वशी सामना पाहण्यासाठी मैदानात
एकीकडे पंत आणि उर्वशी असा वाद सुरु असतानाच आजचा भारत पाक सामना पाहण्यासाठी उर्वशी मैदानात हजर आहे. तिची टीव्हीवरील झलक पाहून त्यांनी तिचं मैदानात असणं आणि पंत संघात नसल्याचा संबंध जोडत अनेक ट्वीट केले आहेत. त्यामुळेच पंतच्या गैरहजेरीमुळे उर्वशी चर्चेत आल्याचं दिसत आहे. काहींनी उर्वशी मैदानात असल्याने पंत स्वइच्छेने खेळत नसल्याचा टोला उर्वशीला लगावला आहे. तर काहींनी तिचं असणं आणि पंतचं नसणं खटकणारं असल्याचं म्हटलं. काहींनी तर पंत असता सामन्यात तर अजून एक जुगलबंदी पहायला मिळाली असती असं म्हटलंय. पाहुयात काही ट्वीट्स…





काही दिवसांपूर्वीच उर्वशीने शेअर केलेला व्हिडीओ
उर्वशीने स्वतःचा बोल्ड लूकमधील व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना उर्वशीने, “मी माझी बाजू न मांडता तुझी प्रतिष्ठा वाचवली आहे,” अशी कॅप्शन दिल्याने हा व्हिडीओही चर्चेत होता.