भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या सामन्यासाठी जगभरातले क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत. सोशल मीडियावर तर मीम्स आणि पोस्ट्सचा पाऊस पडत आहे. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धोनी आणि के.एल. राहुल यांनी मॅच हरण्याची ऑफर दिल्याचं दिसत आहे.

काय आहे हा व्हिडिओ?

हा व्हिडिओ २३ ऑक्टोबरचा आहे ज्यात महेंद्रसिंह धोनी आणि सलामीचा फलंदाज केएल राहुल यांना मॅच हरण्याची ऑफर दिली जात आहे. प्रशिक्षणानंतर दोघेही मैदानावरून हॉटेलकडे जात असताना हा प्रकार घडला. धोनीनेही त्याच्यासमोर आलेल्या या प्रस्तावाला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र हे प्रकरण फारसं गंभीर नसून गमतीशीर आहे.

टीम इंडिया ट्रेनिंगवरून परतत असताना पाकिस्तानची अँकर सवेरा पासा हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती. दरम्यान, तिची नजर केएल राहुलवर पडली. राहुलला पाहताच पाकिस्तानी अँकरने त्याला पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी करू नको, असे सांगितले. सवेरा पासा राहुलला म्हणाली, प्लीज उद्या चांगला खेळू नकोस. तिने तिचं वाक्य अनेकदा रिपीट केलं, ज्यावर राहुल केवळ हसला. त्याने तिला काही उत्तर दिलं नाही.

धोनीने दिलं भन्नाट प्रत्युत्तर; म्हणाला…

यानंतर सवेराने धोनीला पाहिलं, ती धोनीला म्हणाली की, “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नको, ‘माही नॉट दिस मॅच प्लीज!” पण धोनी राहुलसारखा गप्प बसला नाही. त्यांने पाकिस्तानी पत्रकार सवेरा पासाच्या शब्दांना चोख प्रत्युत्तर दिले. धोनी स्पष्टपणे म्हणाला – ‘हेच तर माझे काम आहे.’ धोनीने अर्थातच नाव घेतले नाही पण त्याचा इशारा पाकिस्तानकडे होता. तो ज्या कामाबद्दल बोलत होता ते काम म्हणजे पाकिस्तानला पराभूत करणे.

Story img Loader