Abdul Razzaq on India vs Pakistan Series: भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध नसल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून एकही मालिका खेळली जात नाही. दरम्यान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाकने विश्वचषकापूर्वी वादग्रस्त विधान केले आहे. उभय संघांमध्ये द्विपक्षीय मालिका सुरू करण्याबाबत अब्दुल रझ्झाकने असे काही विधान केले आहे जे भारतीय चाहते अजिबात सहन करणार नाहीत.

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान

१९७-९८ पासून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका फारच क्वचितच खेळल्या गेल्या आहेत आणि आता दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर येतात. अशा स्थितीत माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाक म्हणाला की, “भारत नेहमीच पराभूत होत असल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळत नाही.” तो पुढे म्हणाला की, “भारत हा एकमेव संघ आहे जो पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देतो.”

Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
PAK vs BAN Test Ahmad Shahzad mocking on Pakistan team
PAK vs BAN Test Series : लाजिरवाण्या पराभवानंतर अहमद शहजादने पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बांगलादेशने तुम्हाला तुमच्याच…’
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’

हेही वाचा: MS Dhoni: न्यू लुकमध्ये एम.एस. धोनी चेन्नईत दाखल; विमानतळावर ‘थाला’च्या स्वागतासाठी चाहत्यांनी केला फुलांचा वर्षाव, Video व्हायरल

अब्दुल रझ्झाक याने टीम इंडियाला डिवचले

ईएच क्रिकेटशी बोलताना माजी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाक म्हणाला, “आम्ही सर्व संघांविरुद्ध आदर आणि मैत्री कायम असून आमच्या संबंधांवर शंका घेणारे फक्त बीसीसीआय आहे. भारत हा एकमेव देश आहे जो पाकिस्तानविरुद्ध कोणतीही मालिका खेळण्यास नकार देतो. यामागेही एक कारण आहे, पराभवाच्या भीतीने ते असे करतात. पाकिस्तान संघाविरुद्ध आपण जिंकू शकणार नाही, अशी भीती त्यांना वाटते. यापूर्वीही भारताविरुद्ध पाकिस्तानचे वर्चस्व होते आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.”

माजी खेळाडू पुढे म्हणाला, “२००३ पासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अनेक बदल झाले आहेत. मात्र, तरीही आपण तिथेच अडकलो आहोत. आपण सर्वांनी आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आता दोन्ही संघ खूप मजबूत आहेत आणि तुम्ही म्हणू शकत नाही की पाकिस्तान कमकुवत आहे. अ‍ॅशेस मालिका प्रत्येकजण पाहत असला, यात कोणता संघ अधिक मजबूत आहे हे कोणी सांगू शकेल? कारण जो संघ मैदानात चांगला खेळेल आणि दडपण हाताळेल, तोच आताच्या काळात जिंकेल.”

हेही वाचा: Johny Bairstow: बेअरस्टोची वादग्रस्त विकेट, लेमन ज्यूस अन् बार टेंडर; अश्विनने केला राहुल द्रविडचा खुमासदार किस्सा शेअर

२०२३ वर्ल्डकप मध्ये आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याआधी, आशिया चषक २०२३ मध्ये दोन्ही संघांमध्ये किमान २ सामने खेळले जातील. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये ३ सामने पाहायला मिळतील.