Abdul Razzaq on India vs Pakistan Series: भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध नसल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून एकही मालिका खेळली जात नाही. दरम्यान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाकने विश्वचषकापूर्वी वादग्रस्त विधान केले आहे. उभय संघांमध्ये द्विपक्षीय मालिका सुरू करण्याबाबत अब्दुल रझ्झाकने असे काही विधान केले आहे जे भारतीय चाहते अजिबात सहन करणार नाहीत.
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान
१९७-९८ पासून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका फारच क्वचितच खेळल्या गेल्या आहेत आणि आता दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर येतात. अशा स्थितीत माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाक म्हणाला की, “भारत नेहमीच पराभूत होत असल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळत नाही.” तो पुढे म्हणाला की, “भारत हा एकमेव संघ आहे जो पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देतो.”
अब्दुल रझ्झाक याने टीम इंडियाला डिवचले
ईएच क्रिकेटशी बोलताना माजी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाक म्हणाला, “आम्ही सर्व संघांविरुद्ध आदर आणि मैत्री कायम असून आमच्या संबंधांवर शंका घेणारे फक्त बीसीसीआय आहे. भारत हा एकमेव देश आहे जो पाकिस्तानविरुद्ध कोणतीही मालिका खेळण्यास नकार देतो. यामागेही एक कारण आहे, पराभवाच्या भीतीने ते असे करतात. पाकिस्तान संघाविरुद्ध आपण जिंकू शकणार नाही, अशी भीती त्यांना वाटते. यापूर्वीही भारताविरुद्ध पाकिस्तानचे वर्चस्व होते आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.”
माजी खेळाडू पुढे म्हणाला, “२००३ पासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अनेक बदल झाले आहेत. मात्र, तरीही आपण तिथेच अडकलो आहोत. आपण सर्वांनी आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आता दोन्ही संघ खूप मजबूत आहेत आणि तुम्ही म्हणू शकत नाही की पाकिस्तान कमकुवत आहे. अॅशेस मालिका प्रत्येकजण पाहत असला, यात कोणता संघ अधिक मजबूत आहे हे कोणी सांगू शकेल? कारण जो संघ मैदानात चांगला खेळेल आणि दडपण हाताळेल, तोच आताच्या काळात जिंकेल.”
२०२३ वर्ल्डकप मध्ये आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान
एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याआधी, आशिया चषक २०२३ मध्ये दोन्ही संघांमध्ये किमान २ सामने खेळले जातील. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये ३ सामने पाहायला मिळतील.