भारत विरुद्धचा सामना हा केवळ या दोन देशांच्या संघात होत नाही, तर या दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये देखील हा सामना सुरू असतो. त्यामुळेच या सामन्याची चुरस कायम पाहायला मिळते. त्यामुळेच जगभरातील क्रिकेट चाहते देखील हा सामना मनोरंजनाची मोठी संधी म्हणून पाहतात. आज होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना यामुळेच विशेष आहे.
प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यालाही भारताचा ‘डाय हार्ट फॅन’ सुधीर हजर असणार आहे. त्याने देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्यात. तसेच पाकिस्तानविरुद्ध भारताने कायमच सामना जिंकलाय. यावेळी देखील भारत २००७ प्रमाणे विजय नोंदवेल, अशी आशा व्यक्त केलीय.
भारतीय क्रिकेट चाहता सुधीर म्हणाला, “हा सामना खूप थरारक होणार आहे. आतापर्यंत भारताने पाकिस्तानला कायमच पराभूत केल्याचा विक्रम आहे. भारत २००७ प्रमाणे यावेळी देखील विजयी होईल अशी मला आशा आहे. मी भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यासाठी आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खूप उत्साहानं इथं आलोय.”
पाकिस्तान : (अंतिम १२)बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, इशान किशन, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर
भारत-पाकिस्तान सामन्याविषयी सगळीकडेच अनावश्यक चर्चा रंगते. परंतु आम्ही मात्र याकडे लक्ष न देण्यालाच प्राधान्य देतो. अमिरातीतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन आम्ही संघनिवड केली असून प्रत्येक खेळाडूला त्याच्या भूमिकेबाबत पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या स्पर्धेत नक्कीच दमदार कामगिरी करू, याची मला खात्री आहे. – विराट कोहली, भारताचा कर्णधार
इतिहासाची उजळणी करण्यात आम्हाला मुळीच रस नाही. आम्ही विश्वविजेतेपदाच्या निर्धाराने येथे दाखल झालो असून भारताविरुद्धची लढत आमच्यासाठी अन्य सामन्याप्रमाणेच आहे. यंदा सर्व खेळाडू भारताला नमवण्याबाबत आशावादी असून आमच्या मैदानातील कामगिरीद्वारेच आम्ही ते दाखवून देऊ! -बाबर आझम, पाकिस्तानचा कर्णधार
भारत वि. पाकिस्तान ’ स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी