India vs Pakistan U19 Asia Cup 2024 Live Cricket Streaming: २९ नोव्हेंबरपासून युएई येथे १९ वर्षाखालील आशिया चषक (U-19 Asia Cup 2024) स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाच्या मोहिमेला शनिवारपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होणार आहे आणि भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी एक मजबूत संघ जाहीर केला आहे, ज्याच्या नेतृत्त्वाची जबाबदारी मोहम्मद अमानच्या हातात असेल. आयपीएल लिलावात सर्वांचं लक्ष वेधून घेणारा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीही या सामन्यात खेळणार आहे, त्याला राजस्थान रॉयल्सने नुकत्याच पार पडलेल्या मेगा लिलावात १.१ कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावात निवड झालेला वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. भारतीय संघात आशिया चषकात अ गटात असून पाकिस्तान, जपान आणि संयुक्त अरब अमिराती हे देशही आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा