India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी (१४ ऑक्टोबर) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान बहुप्रतीक्षित सामना पार पडला आणि टीम इंडियाने सलग आठव्यांदा पाकिस्तानी संघाला शह दिला. अहमदाबादच्या भव्य दिव्य नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात भारतीयांच्या वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. अशावेळी एकच माणूस फक्त पाकिस्तानच्या भल्याचा विचार करत होता आणि तो म्हणजे स्वतः अंपायर! असं आम्ही नाही तर सोशल मीडियावर नेटकरी म्हणत आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर सोशल मीडियावर साहजिकच मीम्सना उधाण आलं आहे. पाकिस्तानी संघापासून ते माजी खेळाडूंपर्यंत प्रत्येकाला चिडवलं जात आहे मात्र यावेळेस काहीसा नवा प्रकार म्हणून अनेकांनी पंचांना सुद्धा चांगलंच टार्गेट केल्याचं दिसतंय, नेमकं याचं कारण काय हे ही पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IND vs PAK अंपायरचं चुकलं तरी काय?

दक्षिण आफ्रिकेच्या Erasmus या पंचांनी संपूर्ण सामन्यात तब्बल तीन वेळा पाकिस्तानच्या बाजूने निर्णय देण्याचा प्रयत्न केल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. याची सुरुवात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला एलबीडब्ल्यू अपीलसाठी नाबाद ठरवून झाली. रिअल टाइममध्ये निर्णय स्पष्ट दिसत असतानाही भारताला डीआरएस घ्यावा लागला.

यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर डावखुरा सौद शकीलविरुद्ध अपील करताना सुद्धा पंचांचा निर्णय टेक्नॉलॉजीमुळे चुकीचा सिद्ध झाला. अगदी शेवटी सुद्धा रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर हारिस रौफला नाबाद एलबीडब्ल्यू देण्यात आला, जो निर्णय पुन्हा चुकीचा ठरला.

IND vs PAK Memes: नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हे ही वाचा << IND vs PAK: विराट-सचिनची ग्रेट-भेट! भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान क्रिकेटचा देव भेटला किंग कोहलीला, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

इरास्मस हा ICC पंचांच्या एलिट पॅनेलचा भाग आहे आणि त्याने आजवर ७९ कसोटी, १४३ एकदिवसीय आणि ४३ T20 सामन्यांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. पण साहजिकच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात निर्णय चुकत असल्याने सोशल मीडियाच्या ट्रोलधाडीपासून तो ही वाचलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak umpire erasmus made three huge mistakes with babar kuldeep yadav watch india vs pakistan match highlight svs
Show comments