IND vs PAK Virat Kohli Abrar Ahmed : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात भारताने अत्यंत संयमी खेळ करत पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात आधी गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाचं कंबरडं मोडलं, त्यानंतर विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद चर्चेत आहे. एका बाजूला मैदानातील वर्तनामुळे त्याच्यावर टीका चालू आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्या उत्तम गोलंदाजीमुळे त्याचं कौतुकही होत आहे. शतकवीर विराट कोहलीने देखील अबरारच्या कोट्यातील १० षटकं पूर्ण झाल्यावर त्याच्याशी हस्तांदोलन केलं, त्याच्या उत्तम गोलंदाजीसाठी त्याची पाठ थोपटली. त्यामुळे विराटवरही त्याच्या खिलाडूवृत्तीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा