India vs Pakistan Asia Cup 2022: संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित आशिया चषकातील सर्वात लक्षवेधी, बहुचर्चित सामना आज २८ ऑगस्टला पार पडणार आहे. या सामन्यात क्रिकेटच्या मैदानातील पूर्वापार शत्रू भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. पण नेटकऱ्यांना मात्र काही केल्या धीर धरवत नाही, असं आम्ही नाही तर स्वतः हे नेटकरीच मीम्स शेअर करून सांगत आहेत. खरंतर आजचा भारत- पाकिस्तान सामना दोन्ही संघांसाठीच नव्हे तर दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा असणार आहे. खेळाडूंना गेलेले फॉर्म्स परत आणण्यासाठी, विजयाची सुरुवात करण्यासाठी, अपमानाचा बदला घेण्यासाठी आजचा सामना निर्णायक ठरेल. हा इतका तणाव असताना आपलं डोकं हलकं करण्यासाठी भन्नाट मीम्स पाहुयात?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ७. ३० वाजता सुरु होणार आहे, त्यामुळे सकाळपासून घड्याळाकडे डोळे लावून बसलेले क्रिकेटप्रेमी सूर्यास्ताची वाट पाहत आहे. हे वाट पाहणं थोडं मजेशीर करण्यासाठी हे धम्माल मीम्स पहा. (IND vs PAK LIVE: भारत-पाकिस्तान सामना बघताना Ads ची कटकट नकोय? ‘हे’ एक काम करून पहा)

आज, २८ ऑगस्ट रोजी भारत व पाकिस्तानचा सामना म्हणजे चुरशीची लढत होणार आहे. विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही टीमच्या चाहत्यांनी मजेशीर पोस्टमधून आपल्या लाडक्या टीम व खेळाडूंना पाठिंबा दर्शवला आहे.