IND vs PAK Wasim Akram Video: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने सात गडी राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने बाबर आझम व संघावर जोरदार टीका केली आहे. ‘स्विंगचा सुलतान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्रमने पाकिस्तानच्या निराशाजनक खेळीमागील धक्कादायक कारण सुद्धा स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानी टीव्ही वर एका कार्यक्रमात वसीम अक्रम म्हणाला की,” पाकिस्तानी संघात आता फिटनेस टेस्टच होत नाही. जेव्हा मिसबाह प्रशिक्षक आणि निवडकर्ता होता तेव्हा यो-यो टेस्ट आणि इतर चाचण्या होत असत. तुम्ही जर स्वतःला प्रोफेशनल क्रिकेटर म्हणत असाल तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी अशाप्रकारे स्वतःचीच टेस्ट घ्यायला हवी अन्यथा आता जे झाले (भारताविरुद्ध पराभव) तेच होत राहणार. १५४ ला २ विकेट असताना १९१ ला संघ पूर्णपणे बाद होतो हे खूपच निराशाजनक आहे. “

अक्रमने केवळ खेळाडूच नव्हे तर पीसीबीला व संघाच्या चाहत्यांना सुद्धा यावेळी खडेबोल सुनावले. अक्रम म्हणाला की, “मागील तीन वर्षात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तीन वेळा बदलले, आता ज्या पद्धतीने गोष्टी बदलत आहेत त्यामुळे संघातील खेळाडूंच्या मनात व्यवस्थापनाविषयीच चिंता वाढली आहे. आपण पुढच्या सामन्यात/मालिकेत असू की नसू इथपासून प्रत्येकाला प्रश्न पडत आहेत. तर खेळाडूंचे चाहते आता टीकाकारांवरच टीका करायला उभे राहत आहेत, जर बाबर चांगला खेळला तर आम्ही कौतुकच करू पण कौतुक न केल्याने समीक्षकांनाच क्रूर ठरवले जाते हे काही बरोबर नाही”

Video : वसीम अक्रमने बाबरच्या चाहत्यांची घेतली शाळा

हे ही वाचा<< IND vs PAK सामन्यात पंचांनी केल्या ‘या’ 3 मोठ्या चुका! नेटकरी मैदानात उतरून म्हणाले, “एकटा पाकिस्तानी..”

World Cup 2023 Points Table: भारत व पाकिस्तानची स्थिती काय?

दरम्यान, विश्वचषक २०२३ च्या पुढच्या सामन्यांमध्ये भारत आता बांगलादेशचे आव्हान स्वीकारणार आहे. १९ ऑक्टोबरला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात हा सामना पार पडेल. तर पाकिस्तान २० ऑक्टोबरला एम. चिन्नास्वामी मैदानात ऑस्ट्रेलियासह खेळणार आहे. विश्वचषकाच्या पॉईंट टेबलमध्ये भारत पाकिस्तानला हरवून आता पहिल्या स्थानी आहे तर पाकिस्तान सध्या ४ पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमाने न्यूझीलँड व साऊथ आफ्रिका आहे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak wasim akram video babar azam team gets no fitness test virat kohli rohit sharma aces world cup point table svs