India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023:  एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी (१४ ऑक्टोबर) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. रोमहर्षक सामन्याची अपेक्षा असताना यजमान भारतीय संघाने पाकिस्तानला या सामन्यात डोके वर काढू दिले नाही. कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय पूर्ण केले. तसेच पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आपली विजयाची परंपरा कायम राखली. हिटमॅनचे शतक थोडक्यात हुकले, ते जर पूर्ण झाले असते तर हा विजय आणखी परिपूर्ण झाला असता. मात्र, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका ८-० अशी कायम राखली. या विजयासोबत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला.

भारतीय फलंदाजीपुढे पाकिस्तान नेस्तनाबूत, सात गडी राखून दणदणीत विजय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. त्याचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा त्याच्याविरुद्ध पराभव झालेला नाही.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ

शुबमन गिल मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला

पाकिस्तानकडून मिळालेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डेंग्यूमधून बरा झालेला शुबमन गिल ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. शाहीन आफ्रिदीने त्याला शादाब खानकरवी झेलबाद केले. शुभमन फॉर्ममध्ये दिसत आहे आणि आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून ही चांगली बातमी आहे. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.

कोहलीला मोठी खेळी खेळता आली नाही

पाकिस्तानविरुद्ध सहसा मोठी खेळी खेळणारा विराट या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. क्रीजवर राहिल्यानंतर तो बाद झाला. कोहलीने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या. हसन अलीच्या चेंडूवर मोहम्मद नवाज झेलबाद झाला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर क्रीझवर आला. श्रेयसने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली.

रोहितने षटकारांचा पाऊस पाडला

रोहित शर्माला सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावता आले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने १३१ धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती, मात्र त्याला तसे करता आले नाही. रोहित ६३ चेंडूत ८६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १३६.५१ होता. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला.

श्रेयसने विजयी चौकार ठोकले

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर के.एल. राहुलसह श्रेयस अय्यरने सामना संपवला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या गड्यासाठी ३६ धावांची नाबाद भागीदारी केली. अय्यरने चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि सामना संपवला. ६२ चेंडूत ५३ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. अय्यरने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. के.एल. राहुलने २९ चेंडूत १९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आले.

हेही वाचा: IND vs PAK, World Cup 2023: रोहित शर्मा पुन्हा एकदा ठरला सिक्सर किंग! वनडे क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही

तत्पूर्वी, पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.