SAFF Championship 2023: क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले की, भांडणे, वाद, गदारोळ होणे साहजिकच आहे. क्रिकेटमध्ये अनेकदा भारत-पाक सामना आणि त्यातील लुटुपुटूच्या लढाईबद्दल चर्चा होत असते. पण फुटबॉलमध्ये जेव्हा दोन्ही देश आमनेसामने होते तेव्हा हा सामना काही कमी रंजक नव्हता. सध्या भारतात ‘सॅफ कप’ ही फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जात आहे. यामध्ये सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाला पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागला होता. बंगळुरूच्या ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर हा महामुकाबला चांगलंच रंगला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्णधार सुनील छेत्रीची हॅटट्रिक आणि उदांता सिंगच्या गोलमुळे भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ४-० अशी पराभवाची धूळ चारली. या संपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पूर्णपणे दिसून आला. मात्र, सामना हरल्यानंतर पाकिस्तानचा खेळाडू इसा सुलेमान पराभवानंतरचे बहाणे शोधत भारताला टार्गेट करत आहे. त्याने केलेले भारत सरकारविरुद्धचे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

इसा सुलेमानने सामन्यानंतर कारणे शोधत भारतावर साधला निशाना

सामन्यानंतरच्या मुलाखतीत इसा सुलेमान याने सांगितले की, “पाकिस्तानचा संघ २४ तासांच्या प्रवासानंतर येथे पोहोचला आहे आणि त्यांचे काही खेळाडू सायंकाळी ५ वाजता बंगळुरूला पोहोचले आहेत. भारत सरकारने जर आम्हाला लवकर व्हिसा दिला असता तर आमची एवढी फरफट झाली नसती.” “पाकिस्तानी सेंटर बॅक म्हणाला, ‘भारताविरुद्ध हरणे कठीण आहे, तो एक उत्कृष्ट संघ आहेत. आम्ही २४ तासांचा प्रवास केला आणि आमचे बहुतेक खेळाडू आज संध्याकाळी ५ वाजता बंगळुरूच्या मैदानात पोहोचले. ही सबब नसून वस्तुस्थिती आहे. अजून मेहनत करून आम्ही परत येऊ.”

१०व्या मिनिटाला सुनीलने पहिला गोल केला

१०व्या मिनिटाला सुनीलने सामन्यातील पहिला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. येथून पाकिस्तान संघाला पुनरागमन करण्याची संधी होती, मात्र सामन्याच्या १६व्या मिनिटाला सुनीलने दुसरा गोल करत २-० अशी भक्कम आघाडी घेतली. हा दुसरा गोल पेनल्टीतून झाला. इथून परतणे पाकिस्तानसाठी खूप अवघड होते. त्याचे दडपण संपूर्ण संघावरही दिसून आले. सामन्याच्या पूर्वार्धात पाकिस्तानचा संघ या दबावातून बाहेर पडू शकला नाही, तर टीम इंडिया पूर्णपणे वरचढ दिसत होती.पहिल्या हाफमध्ये २-० अशी आघाडी टीम इंडियाच्या नावावर होती.

टीम इंडिया ४-३-२-१ कॉम्बिनेशनसह मैदानात उतरली होती

सामन्याच्या उत्तरार्धात, पाकिस्तानने पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु टीम इंडियाच्या मजबूत लाइनअपसमोर ते पूर्णपणे स्टॅक केलेले दिसले. या सामन्यात भारतीय संघ ४-३-२-१च्या जोडीने मैदानात उतरली होती आणि पाकिस्तानचा संघ ५-४-१ आघाडीसह मैदानात उतरला होता.

हेही वाचा: Dilip Vengsarkar: “…म्हणून मुख्य निवडकर्ता पद गमवावे लागले”, विराट कोहलीच्या निवडीवर दिलीप वेंगसरकरांचा मोठा खुलासा

भारताचा पुढचा सामना नेपाळशी आहे

सॅफ (SAFF) चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पुढील सामना शनिवार, २४ जून रोजी नेपाळशी होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवरही होणार आहे. टीम इंडियाने नुकताच इंटरकॉन्टिनेंटल चषक २०२३ जिंकला, ज्यामध्ये त्यांनी अंतिम फेरीत लेबनॉनचा २-०असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak we travelled for 24 hours pakistan start making excuses as they cant digest 4 0 defeat avw