IND vs PAK What Did Hardik Pandya Say To Ball Video: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे. सलग आठव्यांदा भारताने पाकिस्तानला मात देऊन विश्वचषकातील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. अगदी अटीतटीचा न होऊनही अगदी साहजिक कारणांमुळे भारत व पाकिस्तान सामना चांगलाच चर्चेत राहिला. विशेष म्हणजे नेटकऱ्यांना चर्चेसाठी अनेक मुद्दे देणारा असा हा सामना ठरला आणि आणि या चर्चांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हार्दिकने बॉलला काय सांगितलं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नीट पाहिला असेल तर तुम्हालाही दिसलं असेल की, हार्दिक पांड्याने ज्या चेंडूवर पाकिस्तानी स्टार खेळाडू इमामची विकेट घेतली त्या चेंडूला भिरकावण्याआधी त्याला हातात धरून काहीसा मंत्र म्हणण्याची कृती केली होती. यानंतर विशेष म्हणजे त्याने त्याच बॉलवर इमामची विकेट घेतली त्यामुळे हार्दिकने ही नेमकी कोणती जादू केली आहे याविषयी जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक होता.

हार्दिक पांड्याने मंत्र म्हणून केलं इमाम-उल-हकला आउट? पाहा Video

अखेरीस या व्हायरल व बहुचर्चित प्रश्नावर स्वतः हार्दिकनेच उत्तर दिलं आहे. मॅचनंतर हार्दिक पांड्याला जतिन सप्रूच्या प्रश्नाचं उत्तर देताना हार्दिक म्हणाला की, “मी बॉलला नाही, स्वत:लाच सांगत होतो.. मी स्वत:लाच समजावत होतो की अचूक टप्प्यावर बॉल टाक, उगाच प्रयोग करायला जाऊ नको”

दुसरीकडे हार्दिक पांड्याने पाकिस्तानी संघासमोर खेळताना मनात काय भावना होती हे सुद्धा बोलून दाखवले. पांड्या म्हणाला की, “बाबर आणि रिझवान हे मर्यादितच शॉट्स खेळत होते. त्यांनी कोणतीही चूक करण्याची संधी घेतली नाही, म्हणूनच आम्ही त्यांच्या पुढे होतो. ते दोघे आक्रमक झाले नाहीत म्हणूनच आम्ही डॉट बॉल टाकू शकलो. मी पाहिले आहे की जर दोन खेळाडू एकाच पद्धतीने फलंदाजी करत असतील तर तेव्हा एक बाद झाल्यावर लगेचच दुसऱ्याला बाद करण्यासाठी खूप तगडी संधी मिळते.”