India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023: वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माची जबरदस्त फलंदाजी पाहून पाकिस्तानचे दिग्गज वसीम अक्रम, मिसबाह-उल-हक आणि मोईन खान यांनी त्याचे कौतुक केले आहे. मात्र, दुसऱ्याकडे पाकिस्तानी गोलंदाजी कमकुवत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने झंझावाती खेळी करत ८४ चेंडूत १३१ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने अनेक मोठे मोडले. सचिन तेंडुलकरला मागे टाकत तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला. तसेच, ख्रिस गेलला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज बनला.
अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्माची दमदार खेळी पाहून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम चिंतेत पडला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहितच्या या खेळीने अनेक संघांना धडकी भरली आहे. वसीम अक्रमने ‘ए’ स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “रोहित शर्मा सध्या शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता अप्रतिम फटके खेळले. इतर फलंदाजांच्या तुलनेत त्याच्याकडे मैदानाच्या चोहीबाजूला फटके मारण्यासाठी अतिरिक्त वेळ आहे. कोहलीने दमदार अर्धशतक केले, त्याची ही खेळी गोलंदाजांचा संयम पाहणारी होती. तो नियंत्रणात असल्याचे दिसून आले, त्याने हवेत फार कमी फटके मारले. दुसरीकडे रोहित आक्रमक फटकेबाजी करताना दिसत होता.”
पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक म्हणाला की, “रोहितचा हा फॉर्म पाहून गोलंदाजांना कुठे गोलंदाजी करायची हे कळत नाही.” तो पुढे म्हणाला, “हे सर्व पाहिल्यानंतर मला वाटते की इतर सर्व संघांवर रोहितला कुठे आणि कशी गोलंदाजी करायची याचा खूप दबाव असेल. तुम्ही चेंडू टाकणार तरी कुठे? जर तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली तर तो तुम्हाला कट, कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने चौकार, षटकार मारेल. जर तुम्ही त्याला स्टंप-टू-स्टंप सरळ गोलंदाजी केली तर तो तुमच्या डोक्यावरून लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि सरळ चौकार मारेल. दुसरीकडे, तुम्ही जर त्याला शॉट बॉल, बाऊन्सर अशी गोलंदाजी केली तर तो पुल, हुक शॉट मारत चौकार-षटकार मारेल. सध्या तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्याला कुठे गोलंदाजी करायची याचे पाकिस्तानी गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.”
वसीम अक्रमनेही पाकिस्तानी गोलंदाजीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “ गोलंदाजाने रोहितसमोर गोलंदाजी करायची तरी कशी? तुम्ही चेंडू टाकणार तरी कुठे अन् कसा? त्याच्यासमोर कोणताही गोलंदाज वाचू शकत नाही.” पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक मोईन खान म्हणाला, “त्याला लवकर बाद करावे लागेल, जर शाहीनने पहिल्या दोन षटकात चांगला यॉर्कर टाकला किंवा चांगला बाउन्सर टाकला तर त्याला बाद करणे सोपे असेल नाहीतर एकदा सेट झाल्यानंतर त्याला बाद करण अवघड आहे.”