India A vs Pakistan A ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023: पुरुष उदयोन्मुख संघ आशिया चषक २०२३ च्या उपांत्य फेरीत भारत अ ने बांगलादेश अ संघाचा ५१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २१२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेश अ संघ १६० धावांवर गारद झाला. आता अंतिम फेरीत भारत अ संघ पाकिस्तान अ संघाशी भिडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान अ संघाने श्रीलंका अ संघाचा ६० धावांनी पराभव केला. टीम इंडियाकडून सेमीफायनलमध्ये निशांत सिंधूने ५ विकेट्स घेतल्या.

प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने ४९.१ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. यादरम्यान यश धुलने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. त्याने ८५ चेंडूत ६६ धावा केल्या. यशने ६ चौकार मारले. अभिषेक शर्माने ६३ चेंडूत ३४ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. सलामीवीर साई सुदर्शनने २४ चेंडूत २१ धावा केल्या. त्याच्या खेळीत ३ चौकारांचा समावेश होता. रियान पराग विशेष काही करू शकला नाही. तो १२ धावा करून बाद झाला. निकिन जोसने १७ धावांचे योगदान दिले. मानव सूधरने २१ धावांची खेळी खेळली. त्याने ३ चौकार मारले.

IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कोचच्या पाकिस्तानला शुभेच्छा, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना
Pakistan Drop Babar Azam Shahen Shah Afridi and Naseem Shah For Last Two Tests Against England PAK vs ENG Test
PAK vs ENG: बाबर आझमची इंग्लंडविरूद्धच्या कसोटी संघातून हकालपट्टी, बाबरसह अनेक स्टार खेळाडूंना दिला डच्चू, कसा आहे नवा संघ?
PAK vs ENG Pakistan vs England 2nd test match use the same pitch in Multan
PAK vs ENG : पाकिस्तानने दुसरी कसोटी जिंकण्यासाठी आखला नवा डावपेच, खेळपट्टीबाबत घेतला मोठा निर्णय
Babar Azam Set To Be Dropped From Pakistan Playing 11 For 2nd Test Against England PAK vs ENG
Babar Azam: बाबर आझम पाकिस्तानच्या कसोटी संघातून होणार बाहेर, इंग्लंडविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात मोठा निर्णय
AUS W vs PAK W Australia beat Pakistan by 9 Wickets
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताची वाढवली डोकेदुखी, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत?
New Zealand Captain Tom Latham Statement on Team India Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: “…तर आम्ही भारतावर विजय मिळवू”, भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने बनवली जबरदस्त रणनिती, हिटमॅन चक्रव्यूह भेदणार?

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १६० धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून तंजीम हसनने ५१ धावांची शानदार खेळी केली. त्याने ५६ चेंडूंचा सामना करत ८ चौकार मारले. मोहम्मद नईमने ३८ धावांचे योगदान दिले. कर्णधार सैफ हसनने २२ धावांची खेळी केली, हसन जॉयने २० धावा केल्या. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. अशाप्रकारे बांगलादेशला ५१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

हेही वाचा: India Injured Players: जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, अय्यरसह ‘या’ पाच खेळाडूंबाबत BCCIने दिले मोठे अपडेट

टीम इंडियासाठी निशांत सिंधूने शानदार गोलंदाजी केली. त्याने ८ षटकात २० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. मानव सूधरने ८.२ षटकात ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्माने ३ षटकात २१ धावा देत १ विकेट आणि युवराज सिंग डोडियाने ७ षटकात ३५ धावा देत १ विकेट घेण्यात यश मिळाले.

हेही वाचा: IND vs WI: किंग कोहलीचा स्वॅग! जर्सी नंबर १८, कसोटी नंबर ५००, अन् ७६वे शतक; विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने श्रीलंकेचा ६० धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. आता भारताने दुसरा उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीतही मजल मारली आहे. २३ जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारताने पाकिस्तानचा पराभव केला. अशा स्थितीत टीम इंडिया चॅम्पियन होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.