India vs South Africa First ODI Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशा फरकाने आघाडी घेतली. या विजयात अर्शदीप-आवेश आणि साई-श्रेयसने मोलाचे योगदान दिले. मालिकेतील दुसरा सामना १९ डिसेंबरला गकबेराह येथे होणार आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. भारताचा या वर्षातील वनडेतील हा २६ वा विजय आहे. १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाने २६ सामने जिंकले होते. कांगारू संघाने २०२३ मध्ये ३० सामने जिंकले आहेत. आफ्रिकन संघाचा पराभव करत भारताने मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पाच वर्षांनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत वनडे जिंकली आहे. टीम इंडियाने शेवटचा २०१८ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर विजय मिळवला होता. त्यानंतर २०२२ मध्ये सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

साई सुदर्शनचे शानदार पदार्पण –

जोहान्सबर्गच्या न्यू वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा संघ २७.३ षचकांत ११६ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १६.४ षटकांत ११७ धावा करत सामना जिंकला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने नाबाद ५५ धावा केल्या. त्याने ४३ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार मारले. श्रेयस अय्यरने ४५ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. ऋतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला. तिलक वर्मा एक धाव घेत नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डर आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IPL 2024 Auction : लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती रक्कम आणि जागा शिल्लक? पाहा संपूर्ण यादी

अर्शदीप-आवेशची कमाल –

भारताकडून अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी गोलंदाजीत कमाल केली. दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या. अर्शदीपला पाच आणि आवेशला चार विकेट मिळाल्या. डावाच्या दुसऱ्या षटकातच अर्शदीप सिंगने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्शदीपने रीझा हेंड्रिक्सला बोल्ड केले. चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील कडा घेऊन विकेटवर आदळला. रिझाला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी व्हॅन डर डुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला खातेही उघडता आले नाही. अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली. टोनी डीजॉर्ज चांगल्या टचमध्ये दिसत होता, पण अर्शदीपने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अर्शदीपने टोनी डी जॉर्जीला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्याला २२ चेंडूत २८ धावा करता आल्या. यानंतर अर्शदीपने डावाच्या दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेनरिक क्लासेन (६)ला बाद केले.

हेही वाचा – IPL 2024 : सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरपदावरुन पायउतार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास –

अर्शदीपसह आवेश खानची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. आफ्रिकेच्या डावातील ११व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्करम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर आवेशने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकडे झेलबाद केले. मिलरला दोन धावा करता आल्या. यानंतर त्याने केशव महाराज (२५) याला बाद करत चौथ्या विकेट्स घेतली. अर्शदीपला डावातील २६व्या षटकात पाचवे यश मिळाले. मैदानावर स्थिरावलेल्या अँडिले फेहलुकवायोला त्याने एलबीडब्ल्यू आऊट केले. ४९ चेंडूत ३३ धावा करून तो बाद झाला. तर, कुलदीपने शेवटची विकेट घेतली. तसेच अर्शदीप सिंग दक्षिण आफ्रिकेत पाच विकेट्स घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.