South Africa’s ODI history in Pink Jersey : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत सोडवल्यानंतर, आजपासून म्हणजेच १७ डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करुन मैदानात उतरला आहे, या मागे नक्की काय कारण आहे जाणून घेऊया.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्यात, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ त्याच्या नियमित हिरव्या जर्सीऐवजी गुलाबी जर्सीमध्ये दिसला. दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीच्या रंगात हा बदल पिंक डे वनडे आयोजित करण्याच्या त्यांच्या परंपरेचा भाग आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ ‘पिंक डे वनडे’ मध्ये गुलाबी जर्सी परिधान करून स्तन कर्करोगाचे शिक्षण, जागरूकता, संशोधन आणि शोध यासाठी आपला पाठिंबा दर्शवतो.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) चे सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी पिंक डे वनडेबद्दल म्हणाले, “आम्हाला पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांसोबत स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करताना आनंद होत आहे. स्तनाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात केवळ जागरूकता पुरेशी नाही. आम्ही लोकांना स्तनाच्या कर्करोगाबाबत सक्रिय होण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो. दक्षिण आफ्रिकेतील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे, परंतु त्याचा परिणाम पुरुषांवरही होऊ शकतो. याचे लवकर निदान झाल्यास, उपचार सकारात्मक परिणाम देऊ शकतात.”

हेही वाचा – IPL 2024 : कर्णधार करत असाल तर येतो, हार्दिकच्या या अटीने गेलं रोहितचं कर्णधारपद

गुलाबी जर्सीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय इतिहास:

गुलाबी जर्सी मधील दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. प्रोटीज संघाने गुलाबी जर्सीमध्ये आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत. दरम्यान, संघाने १० सामने जिंकले आहेत, तर केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विरोधी संघाचा हा उत्कृष्ट विक्रम भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे.

हेही वाचा – IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करणारा, कोण आहे साई सुदर्शन?

सामन्याबद्दल बोलायचे तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फलंदाजी करताना संघाने १३ षटकानंतर ७ बाद ५८ धावा केल्या आहेत. एंडिले फेहलुकवायो आणि केशव महाराज सध्या खेळपट्टीवर आहेत. भारतीय संघाकडून अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करताना ४ आणि आवेश खानने ३ गडी बाद केले आहेत.