India vs South Africa 1st T20 Live Score, 08 November 2024: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ रोजी डर्बनमधील किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज पुन्हा टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमधील संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. टी-२० विश्वचषक विजयानंतर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. विश्वचषकामध्ये अखेरच्या क्षणांमध्ये विजय मिळवत आफ्रिकेकडून विजय हिसकावून घेतला होता.
IND vs SA 1st T20I Live Updates in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान
रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर
भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याची नाणेफेक आफ्रिकेने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला असंही प्रथम फलंदाजी करायची होती असं सूर्याने म्हटलं आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याची नाणेफेर ८.०० वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं एक मोठे आव्हान असते. त्यामुळे नाणेफेक जिंकून संघ फलंदाजी की गोलंदाजी निवडणं यावर नजरा असणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० सामन्यासाठी दोन नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. यामध्ये अष्टपैलू खेळाडू रमणदीप सिंह आणि वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाक यांना संधी देण्यात आली आहे.
आजच्या सामन्यादरम्यान पावसाची ४० टक्के शक्यता आहे. डर्बनमध्ये रात्रीचा टी-२० सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामना डर्बनमध्ये खेळवला जाणार होता, परंतु हवामानामुळे तो एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता.
अभिषेक शर्मासाठीही ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जुलैमध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिलक वर्माला सुद्धा या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. डावखुऱ्या फलंदाजाने ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना चांगली कामगिरी केली होती. परंतु त्यानंतर तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ टी-२० सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने १५ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील केवळ एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही.
एडन माक्ररम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमटेन, ट्रिस्टन स्टब्स.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.
भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामना आज ८ नोव्हेंबरला डर्बन येथे खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषकावर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ भिडणार आहेत. पहिल्याच सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
IND vs SA 1st T20I Live Updates in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका या पराभवाचा बदला घेणार की भारतीय संघ पुन्हा बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.