India vs South Africa 1st T20 Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे या सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार होती. त्यानंतर सामना साडेसात वाजता सुरू होणार होता. मात्र, बराच वेळ पाऊस पडत होता. त्यामुळे नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही. यानंतर पाऊस थांबण्याची खूप वेळ प्रतीक्षा पाहण्यात आली, मात्र पाऊस थांबला नाही. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार

प्रेक्षक निराश होऊन परतले –

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये आले होते. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. मात्र, आता चाहत्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. सामन्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली असली, तरी तब्बल अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उभय संघांमधला दुसरा सामना १२ डिसेंबरला गेबेरहा येथे होणार आहे. तिसरा आणि शेवटचा सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : विराट-रोहितच्या खेळण्यावर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘टी-२० विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडूंची…’

टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचे फक्त ५ सामने शिल्लक –

आयसीसी टी-२० विश्वचषका २०२४ यावेळी परदेशी भूमीवर खेळवला जाईल. या विश्वचषकापूर्वी भारताला फक्त ५ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. यापैकी भारतीय संघ अफगाणिस्तानसोबत मायदेशात तीन सामने खेळणार आहे. अफगाणिस्तानचा संघ जानेवारी २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. जिथे उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

दुसरीकडे, बीसीसीआयलाही टी-२० विश्वचषकापूर्वी युवा भारतीय संघ तयार करायचा आहे. कारण गेल्या एक वर्षापासून रोहित शर्मापासून विराट कोहली आणि केएल राहुलपर्यंत संघातील वरिष्ठ खेळाडूंनी एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२४च्या टी-२० विश्वचषकात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader