India vs South Africa 1st T20I weather and Pitch Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना रविवारी (१० डिसेंबर) डरबनमधील किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. डरबनची खेळपट्टी कशी असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मालिकेची सुरुवात विजयाने करायची आहे. पहिला टी-२० जिंकून मालिकेत लवकर आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय केले पाहिजे आणि या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या किती आहे? जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डरबनमधील किंग्समीड क्रिकेट स्टेडियमची विकेट पारंपारिकपणे वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. येथे वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी मिळते. ही जगातील सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे. वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर खूप मदत मिळते. मात्र, येथे खूप धावा देखील होतात. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे फायदा होऊ शकतो. येथे पाठलाग करणाऱ्या संघाची सरासरी १४३ धावा आहे. अलीकडे, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ तीन टी-२० सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले होते, जिथे तिन्ही वेळा १९० पेक्षा जास्त धावसंख्या झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० धावा केल्या तर विजयाची शक्यता जास्त असते. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी १५३ धावांची आहे.

किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर १८ टी-२० सामने खेळले गेले आहेत.

किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ५ सामने जिंकले आहेत तर पाहुण्या संघाने ६ सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने डरबनमध्ये ४ टी-२० सामने खेळले आहेत आणि चारही जिंकले आहेत. या खेळपट्टीवर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध २१८ धावा केल्या आहेत, तर टीम इंडियाची येथे सर्वात कमी धावसंख्या १४१ धावा आहेत.

हेही वाचा: IND vs SA 1st T20: टीम इंडियासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग-११

किंग्समीड स्टेडियमवर भारताचा यापूर्वीचा विक्रम

भारताने या मैदानावर आतापर्यंत एकूण पाच टी-२० सामने खेळले आहेत, २००७ मध्ये भारताने आपले सर्व सामने येथे खेळले होते. भारताने येथे ५ पैकी ३ सामने प्रथम फलंदाजी करत जिंकले आहेत. येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला, जो भारताने ३७ धावांनी जिंकला होता.

टी-२० मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघातील आकडेवारी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात किती टी-२० सामने खेळले गेले: २३

टी-२० मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला किती सामन्यात पराभूत केले: १३

टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला किती सामन्यात पराभूत केले: १०

भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर किती वेळा पराभूत केले: ५

हेही वाचा: IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हवामान अहवाल

हवामान वेबसाइट Accuweather नुसार, डरबनमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबरला पावसाची ६० टक्के शक्यता आहे. म्हणजे पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो. दिवसभरात कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर संध्याकाळी तापमान २० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 1st t20 will rain spoil todays match know the stats of team india in durban avw