India vs South Africa 1st Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. पावसामुळे या सामन्याला उशीर झाला. सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड एका नव्या रूपात दिसत होते. त्यांचा हा नवा अवतार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
वास्तविक, सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या पहिल्या कसोटीत पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला होता. ओल्या (आउटफिल्डमुळे) मैदानामुळे नाणेफेक दुपारी १.४५ वाजता झाली. तत्पूर्वी, खेळपट्टी सुकविण्यासाठी स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी ड्रायरची मदत घेऊन खेळपट्टी कोरडी केली. खेळपट्टी कोरडी होत असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वतः हा गोलंदाजी केली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये आमनेसामने आहेत. सोमवारी रात्री येथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे नाणेफेकीला उशीर तर झालाच, शिवाय खेळपट्टी लवकरात लवकर कोरडी करण्याचीही काही व्यवस्था करण्यात आली. येथे स्टेडियमचे कर्मचारी हेअर ड्रायरच्या सहाय्याने खेळपट्टीवरील ओले पॅचेस कोरडे करताना दिसले.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल पाहायला मिळाले
भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात रवींद्र जडेजाच्या जागी आर. अश्विनला संधी देण्यात आली होती, कारण पाठीच्या दुखण्यामुळे जडेजा या कसोटीसाठी उपलब्ध नव्हता. त्याचवेळी प्रसिध कृष्णाला उपकर्णधार जसप्रीत बुमराहने सामन्यापूर्वी पदार्पण कॅप दिली.
उपाहारापर्यंत कोहली–अय्यरची शानदार फलंदाजी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात ९१ धावा केल्या आहेत. विराट कोहली ३३ आणि श्रेयस अय्यर ३१ धावांवर नाबाद आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. उपाहारापूर्वी भारताला तीन धक्के बसले. यशस्वी जैस्वाल १७ धावा करून, रोहित शर्मा पाच धावा करून आणि शुबमन गिल दोन धावा करून बाद झाले. नांद्रे बर्गरने दोन गडी बाद केले. कागिसो रबाडाला यश मिळाले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची प्लेइंग –११
भारत– रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका– डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डीजॉर्ज, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हर्नी, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्जर.