India vs South Africa 1st Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे, परंतु त्याच्या एक दिवस आधी सेंच्युरियनमधील हवामान ढगाळ दिसत आहे. भारताच्या सराव सत्राच्या दिवशीच येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान, संघाच्या सरावात पाऊस अडथळा ठरला आहे. सेंच्युरियन येथे संपूर्ण दिवसाचे भारताचे वेळापत्रक २५ डिसेंबरला निश्चित करण्यात आले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ दुपारपासून सराव सत्रात भाग घेणार होता. दरम्यान, तीन सत्रांचे आयोजन करण्यात येणार होते. पहिले सराव सत्र भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार होते. मात्र सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळवली जाणार आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नजरा एका मोठ्या विक्रमाकडे असतील, त्याला हा विक्रम करण्यासाठी केवळ ६६ धावांची गरज आहे. असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे.

विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, त्याने या संघाविरुद्ध ३ शतके झळकावली आहेत. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २४ कसोटी डावांमध्ये १२३६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक २५४ धावा आहेत. सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीकडून शानदार खेळीची अपेक्षा आहे. कोहली दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. कोहलीने विश्वचषक २०२३ नंतर विश्रांती घेतली होती. तो लंडनमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतूनही बाहेर राहिला. आता कोहली टीम इंडियात पुनरागमन करत असून पहिल्याच कसोटीत तो मोठा विक्रम करण्याच्या जवळ आहे.

या महान विक्रमावर विराट कोहलीच्या नजरा

विराट कोहलीने आतापर्यंत सहा वेळा एका वर्षात २००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या बाबतीत तो कुमार संगकाराबरोबर संयुक्तपणे आघाडीवर आहे, त्यानेही सहा वर्षात दोन हजारांहून अधिक धावा केल्या होत्या. कोहली यंदाच्या २००० धावांपासून ६६ धावा दूर आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना दोन्ही संघांसाठी वर्षातील शेवटचा सामना आहे. या सामन्यात कोहलीने ६६ किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो ७ वेगवेगळ्या वर्षांत २००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.

हेही वाचा: IPL2024: गुजरात टायटन्समध्ये हार्दिक पंड्याची कमतरता कोण पूर्ण करेल? आकाश चोप्रा म्हणाला, “फलंदाजीत ही शक्यता…”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली चौथा फलंदाज ठरला आहे

याशिवाय जर विराट कोहलीने या कसोटी मालिकेत ७१ धावा केल्या तर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरेल, सध्या तो चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीने १२३६ धावा केल्या आहेत, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सेहवागने १३०६ धावा केल्या आहेत. कोहली ७१ धावा करून सेहवागला मागे टाकू शकतो. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७४१ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 1st test will indias practice sessions be cancelled heavy rain started in centurion avw