भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होत आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रविवारी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय मध्ये भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतासाठी अष्टपैलू शाहबाज अहमद याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत एक गडी बाद केला. शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे, पण भारतीय संघासाठी त्याला आज पहिल्यांदाज खेळण्याची संधी मिळाली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्वतःचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अहमदने यापूर्वी बंगाल संघासाठी देशांतरगत क्रिकेटमध्ये १९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११०३ धावा केल्या आणि यादरम्यान ६२ बळी देखील घेतले आहेत.

भारतीय संघात ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांच्याजागी वॉशिंग्टन सुंदर आणि पदार्पण करणाऱ्या शाहबाज अहमद यांचा समावेश केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २७ सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये अहमदने ६६२ धावा केल्या आणि २४ गडी बाद केले आहेत. देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये त्याने ५६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ५१२ धावा केल्या, तर ३९ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये अहमद रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळतो. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी आपण पाहिली तर त्याने २९ सामन्यांमध्ये २७९ धावा केल्या, गोलंदाजीत १३ गडी बाद केले. नुकत्याच पार पडलेल्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील एकदिवसीय सामन्यात देखील अहमदने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

Story img Loader