भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रविवारी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय मध्ये भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. अशा परिस्थितीत उद्या रांची येथे होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ ताकदीने उतरतील पण खेळाडू जखमी होणार नाहीत याचीही काळजी ते घेतील..

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित सामन्यांसाठी जायबंदी दीपक चहरच्या जागी डावखुरा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याची निवड केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताचा वरचष्मा अपेक्षित आहे. लखनऊमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताचा अवघ्या ९ धावांनी पराभव झाला. अशा स्थितीत भारतीय संघ या सामन्यात दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल. भारताला या सामन्यात संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यरकडूनही खूप आशा असतील.

हवामान आणि खेळपट्टी अंदाज

रांचीमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल असेल. त्याचवेळी दव या सामन्यात मोठी भूमिका बजावणार आहे. अशा परिस्थितीत या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे हा योग्य निर्णय असेल. त्याच वेळी, या मैदानाचा इतिहास पाहता सरासरी धावसंख्या ही २८० ते ३२० आहे.

हेही वाचा :  IND vs SA 2nd ODI: मुकेश कुमार करू शकतो पदार्पण, जाणून घ्या दुसऱ्या सामन्यात काय असेल भारताची रणनीती 

रांचीमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान पाऊस दोन्ही संघांसाठी अडचणीचा ठरू शकतो. रविवारी रांचीमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे, तरी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेदर.कॉम नुसार, रविवारी रांचीमध्ये पावसाची २५ टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत पावसामुळे सामना विस्कळीत होऊ शकतो आणि तो सामन्यात अडथळा ठरू शकतो. रांचीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल. या दरम्यान दुपारपर्यंत येथे ७५ टक्के आर्द्रता राहील. त्याच वेळी, येथे तापमान ३० अंशांच्या आसपास राहू शकते.