दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सहा षटकात आक्रमक सुरूवात केली.पहिल्या दहा षटकात भारतीय संघ १०० धावा फलकावर लावणार तेवढ्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यातील निम्म्या धावा या चौकार आणि षटकार यांनीच केल्या आहेत. एडन मार्कराम दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत केएल राहुलचे अर्धशतक साजरे केले. त्याने २७ चेंडूत ५७ धावा केल्या. अर्धशतक होताच केएल राहुल बाद झाला.
रोहित-राहुलने आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेले असताना त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी मैदानात सापाने दर्शन दिलं. के एल राहुलच्या चाणाक्ष नजरेतून साप सुटला नाही. त्याने तत्काळ ही बाब पंचांच्या कानावर घातली. पंचांनी मैदानावरल कर्मचाऱ्यांना सांगून सापाचा बंदोबस्त केला. यादरम्यान खेळ १० मिनिटांसाठी थांबविण्यात आला होता. खरंतर तो रोहित शर्माला त्याच्या ४००व्या सामन्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आला होता. अशा परिस्थितीत भारतीय सलामीवीरांना प्रथम फलंदाजी करताना पॉवर प्लेमध्येच आक्रमक सुरूवात केली. पण सातव्या षटकानंतर खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. कारण त्याच दरम्यान नागराजाचे दर्शन झाले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्याला बाहेर हाकलले.
गुवाहाटीमध्ये सध्या सुर्यकुमार यादवची त्सुनामी आली आहे. त्याने त्याचा फॉर्म पुढे सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केले. जवळपास निम्यापेक्षा कमी चेंडूत त्याने ते पूर्ण केले. १८चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच बरोबर भारताने २०० धावा पूर्ण केल्या. दोघांमध्ये १०२ धावांची भागीदारी झाली आहे. एकही असा आफ्रिकेचा गोलंदाज नव्हता की त्याला भारतीय फलंदाजांनी चोपले नाही. आजच्या सामन्यातील हे तिसरे अर्धशतक ठरले असते. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव नंतर आता विराट कोहलीने पण आपले अर्धशतक केले असते. मात्र त्याला शेवटच्या षटकात चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने २९ चेंडूत ४९ धावा केल्या. दिनेश कार्तिकच्या शेवटच्या षटकातील आतिषबाजीने भारत २३७ धावांपर्यंत पोहचला. त्याने ७ चेंडूत १७ धावा केल्या. आता विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला २३८ धावांची गरज आहे.