भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी२० सामना गुवाहाटी येथे सुरू झाला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने २३७ धावा उभारलेल्या. याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. डेव्हिड मिलरने शानदार अर्धशतक केले मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रिले रॉसो यांना भोपळाही फोडता आला नाही. मात्र, तरीही भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली. यासोबतच भारतीय संघाने प्रथमच मायदेशात दक्षिण आफ्रिकेला मालिकेत पराभूत केले. केएल राहुल याला सामनावीराचा किताब देण्यात आला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सहा षटकात आक्रमक सुरूवात केली.पहिल्या दहा षटकात भारतीय संघ १०० धावा फलकावर लावणार तेवढ्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यातील निम्म्या धावा या चौकार आणि षटकार यांनीच केल्या आहेत. एडन मार्कराम दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत केएल राहुलचे अर्धशतक साजरे केले. त्याने २७ चेंडूत ५७ धावा केल्या. अर्धशतक होताच केएल राहुल बाद झाला.
गुवाहाटीमध्ये सुर्यकुमार यादवची त्सुनामी आली होती. त्याने त्याचा फॉर्म पुढे सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केले. जवळपास निम्यापेक्षा कमी चेंडूत त्याने ते पूर्ण केले. १८चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच बरोबर भारताने २०० धावा पूर्ण केल्या. दोघांमध्ये १०२ धावांची भागीदारी झाली आहे. एकही असा आफ्रिकेचा गोलंदाज नव्हता की त्याला भारतीय फलंदाजांनी चोपले नाही. आजच्या सामन्यातील हे तिसरे अर्धशतक ठरले असते. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव नंतर आता विराट कोहलीने पण आपले अर्धशतक केले असते. मात्र त्याला शेवटच्या षटकात चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने २९ चेंडूत ४९ धावा केल्या. दिनेश कार्तिकच्या शेवटच्या षटकातील आतिषबाजीने भारत २३७ धावांपर्यंत पोहचला. त्याने ७ चेंडूत १७ धावा केल्या.
अर्शदीप सिंगने आजच्या सामन्यात पुन्हा एकदा कहर केला. कारण आपल्या पहिल्या षटकातच त्याने दोन बळी मिळवले. अर्शदीपच्या या दोन विकेट्समुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. पण त्यानंतर डेव्हिड मिलरने अर्धशतक झळकावले खरे, पण भारताचे आव्हान एवढे मोठे होते की, त्यांच्यापासून विजय मात्र दुरावला होता. त्यामुळे जरी मिलर आणि क्विंटन डीकॉक ही जोडी खेळपट्टीवर असली तरी ते विजय मिळवू शकणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले होते.