India vs South Africa 2nd T20 Highlights, 10 November 2024 : ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतावर दुसऱ्या टी-२० सामन्यात ३ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. यासह दोन्ही संघांमधील चार सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात स्टब्सने ४१ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने ४७ धावांची नाबाद खेळी साकारत यजमानांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला भारताकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चार षटकांत १७ धावा देत पाच बळी घेत संघाला विजयापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण स्टब्सच्या वादळी खेळीने त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि ८६ धावांत सात विकेट्स गमावल्या होत्या. एकेकाळी वरुणच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या जोरावर भारत हा सामना जिंकण्यात यशस्वी होईल असे वाटत होते, पण शेवटी स्टब्सने आक्रमक खेळी साकारत यजमाान संघाला विजयापर्यंत नेले. त्याने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खानला लक्ष्य करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या गोलंदाजांनी भारताला सुरुवातीपासूनच धक्के दिले आणि भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्याने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद ३९ धावा केल्या. हार्दिक व्यतिरिक्त अक्षर पटेलने २१ चेंडूत २७ आणि तिलक वर्माने २० चेंडूत २० धावांचे योगदान दिले.
India vs South Africa 2nd T20 Match Highlights, 10 October 2024 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २९ टी-२० सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी भारताने १७ आणि दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.
रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३ विकेट्स राखून पराभव केला
https://twitter.com/ProteasMenCSA/status/1855668659659657650
दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव केला आहे. यजमानांनी टी-२० मालिकेतील दुसरा सामना ३ गडी राखून जिंकला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 124 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १९ षटकांत ७ गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन स्टब्सने निर्णायक खेळी साकारली, ज्याच्यामुळे भारतासाठी पाच विकेट्स घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी फेरले.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 13 धावांची गरज आहे
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 12 चेंडूत 13 धावांची गरज आहे. संघाने 18 षटकांत 7 गडी गमावून 112 धावा केल्या आहेत. स्टब्स 31 धावा करून खेळत आहे. कोएत्झी 19 धावा करून खेळत आहे.
दक्षिण आफ्रिकेला 7 वा धक्का बसला, बिश्नोईची विकेट घेतली
https://twitter.com/VikasYadav66200/status/1855662606054523273
दक्षिण आफ्रिकेची 7वी विकेट पडली. सिमलेन 7 धावा करून बाद झाली. रवी बिश्नोईने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात आहे. त्याला विजयासाठी 26 चेंडूत 39 धावांची गरज आहे. पण आता फक्त 3 विकेट शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिकेने 15.4 षटकात 7 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने 14 षटकांत 75 धावा केल्या
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 36 चेंडूत 50 धावांची गरज आहे. त्याने 14 षटकात 6 गडी गमावून 75 धावा केल्या आहेत. ट्रिस्टन स्टब्स २० धावा करून खेळत आहे. सिमलेन 3 धावा करून खेळत आहे. भारत विकेटच्या शोधात आहे.
वरुण चक्रवर्तीने डेव्हिड मिलरला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले
वरुण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात डेव्हिड मिलरच्या रूपाने पाचवी विकेट घेतली, ज्याला त्याने गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आफ्रिकन संघाला विजयासाठी अजून 59 धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी त्याने विस्फोटक हेनरिक क्लासेनला झेलबाद केले होते.
https://twitter.com/VikasYadav66200/status/1855659553116803113
वरुण चक्रवर्तीने डेव्हिड मिलरला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले
वरुण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात डेव्हिड मिलरच्या रूपाने पाचवी विकेट घेतली, ज्याला त्याने गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आफ्रिकन संघाला विजयासाठी अजून 59 धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी त्याने विस्फोटक हेनरिक क्लासेनला झेलबाद केले होते.
https://twitter.com/VikasYadav66200/status/1855659553116803113
वरुण चक्रवर्तीने मार्को यान्सनला दाखवला तंबूचा रस्ता
वरुण चक्रवर्तीने दुसऱ्या टी-20 सामन्यात मार्को यान्सनच्या रूपाने भारतीय संघाला चौथे यश मिळवून दिले, ज्याला त्याने वैयक्तिक 7 धावांवर बोल्ड केले. 11 षटकांचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 65 धावा केल्या असून, आता त्यांना विजयासाठी आणखी 60 धावांची गरज आहे.
https://twitter.com/SachinTomar9507/status/1855656744019730925
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 68 धावांची गरज आहे
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 60 चेंडूत 68 धावांची गरज आहे. संघाने 10 षटकांत 3 गडी गमावून 57 धावा केल्या आहेत. ट्रिस्टन स्टब्स आणि मार्को यान्सेन फलंदाजी करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला
दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट पडली. रीझा हेंड्रिक्स २४ धावा करून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेने 7.4 षटकात 44 धावा केल्या आहेत.
https://twitter.com/CricWatcher11/status/1855651708963004605
दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट पडली
वरुण चक्रवर्तीने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमला क्लीन बोल्ड केले. मार्करामला केवळ 3 धावा करता आल्या. आता आफ्रिकेची धावसंख्या 6 षटकांत 2 गडी गमावून 34 धावा झाली आहे.
https://twitter.com/legbeforewickt/status/1855650502391816619
दक्षिण आफ्रिका 5 षटकांनंतर 33/1
5 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने एक विकेट गमावून 33 धावा केल्या आहेत. रीझा हेंड्रिक्सने 17 तर कर्णधार एडन मार्करामने 3 धावा केल्या आहेत. आफ्रिकन संघाला अजूनही 15 षटकांत विजयासाठी 92 धावा करायच्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, अर्शदीपने घेतली विकेट
भारताकडून अर्शदीप सिंगला पहिली विकेट मिळाली. रिक्लेटन 13 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने 3 षटकात 1 गडी गमावून 22 धावा केल्या आहेत. हेंड्रिक्स ९ धावा करून खेळत आहे. मार्करमला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
https://twitter.com/VikasYadav66200/status/1855645759162503613
दक्षिण आफ्रिकेने 2 षटकांत 16 धावा केल्या
दक्षिण आफ्रिकेने 2 षटकात बिनबाद 16 धावा केल्या. रिक्लेटन आणि हेंड्रिक्स प्रत्येकी 8 धावांसह खेळत आहेत. आवेश खानने भारताकडून दुसरे षटक टाकले. त्याने 9 धावा दिल्या.
भारताने दक्षिण आफ्रिकेला 125 धावांचे लक्ष्य दिले
भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 125 धावांचे लक्ष्य दिले . भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्मा 4 धावा करून बाद झाला. सूर्याही 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्याने नाबाद 39 धावा केल्या. अक्षर पटेलने 27 धावा केल्या. तिलक वर्माने 20 धावा केल्या. अशा प्रकारे भारताने 20 षटकांत 6 विकेट गमावून 124 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने चमकदार गोलंदाजी केली. यजमानांकडून मार्को जॅन्सन, कोएत्झी, मिसलेन, पीटर आणि एडन मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली
हार्दिक पंड्याने सावरला भारताचा डाव
हार्दिक पंड्या चांगली फलंदाजी करत आहे. आतापर्यंत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. पांड्याने 33 धावा केल्या आहेत. अर्शदीप सिंग 6 धावा करून खेळत आहे.भारताने 18 षटकांत 6 गडी गमावून 115 धावा केल्या आहेत.
भारताला बसला सहावा धक्का, रिंकू सिंग नऊ धावा करून झेलबाद
भारताची सहावी विकेट रिंकू सिंगच्या रूपाने पडली. अवघ्या 9 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडियाने 15.2 षटकात 6 गडी गमावून 87 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या 14 धावा करून खेळत आहे
https://twitter.com/ShihabudeenMb/status/1855630854979985849
टीम इंडियाने 70 च्या स्कोअरवर 5वी विकेट गमावली
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलच्या रूपाने 70 धावांवर आपली 5वी विकेट गमावली आहे, जो 27 च्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
एडन मार्करमने तिलक वर्मालाचा घेतला अप्रतिम कॅच
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ४५ धावांवर तिलक वर्माच्या रूपात चौथी विकेट गमावली, ज्यात त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात एडन मार्करमने महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ९ षटकांचा खेळ संपल्यानंतर ४ विकेट गमावून ५२ धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या १ तर अक्षर पटेल २० धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/priyanshusports/status/1855622518654296550
टीम इंडियाला तिसरा झटका, सूर्या बाद
भारताची तिसरी विकेट कर्णधार सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. तो 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सिमलने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने 4 षटकात 2 गडी गमावून 15 धावा केल्या.
भारताला दुसरा धक्का, अभिषेक शर्माही बाद
भारताची दुसरी विकेट पडली. अभिषेक शर्मा ४ धावा करून बाद झाला. कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने १.५ षटकांत २ विकेट गमावून ५ धावा केल्या आहेत.
भारताला बसल पहिला धक्का, सॅमसन झाला बाद
भारताला मोठा धक्का बसला आहे. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. मार्को जॅनसेनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आहे. पहिल्या षटकात भारताला एकही धाव मिळाली नाही.
दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
https://twitter.com/BCCI/status/1855605333936439747
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर
दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने संघात एक बदल केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्रुगरच्या जागी रीझा हेंड्रिक्सला संधी देण्यात आली आहे.
पावसाची शक्यता किती आहे?
Accuweather नुसार, भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या T20 सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. वादळ येण्याची 11% शक्यता आहे. नाणेफेकीच्या वेळी (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता) पावसाची शक्यता 49 ते 54 टक्के आहे. सामन्याच्या उत्तरार्धात 40 टक्क्यांपर्यंत कमी होण्यापूर्वी रात्री 8 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 63 टक्क्यांपर्यंत वाढते.
भारताला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. या सामन्यातील नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय नोंदवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाच्या नजरा विजयाकडे असतील, त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या संघाला मोठी आघाडी मिळणार आहे. दुसरीकडे, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर, एडेन मार्करमला मालिकेत बरोबरी साधता यावी यासाठी पुनरागमनाकडे लक्ष असेल.
अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आणि संजू सॅमसन तुफान फॉर्मात दिसला. संजूने या सामन्यात 107 धावांची खेळी खेळली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला, परंतु त्याचा सलामीचा जोडीदार अभिषेक शर्मा या सामन्यात अपयशी ठरला. अभिषेकला सातत्याने संधी मिळत आहेत, मात्र तो संघासाठी धावा काढू शकत नाही आणि ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.
गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही खेळपट्टीवर मदत मिळेल
सेंट जॉर्ज पार्कची खेळपट्टी संतुलित आहे. सुरुवातीला ती फलंदाजांसाठी अनुकूल असते, पण जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी फिरकी गोलंदाजांना मदत करु लागते. नाणेफेक जिंकणारे संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतात. गेकेबेहारामध्ये दक्षिण आफ्रिकेचा विक्रम चांगला असून या संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी भारतीय संघ येथे हरला होता.
दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान, जितेश शर्मा
https://twitter.com/BCCI/status/1855265203576869063
दक्षिण आफ्रिकेचा संघ: एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर,
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता टॉस होईल. हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर होत आहे.
https://twitter.com/ProteasMenCSA/status/1855479516912640072
भारत आणि दक्षिण आफ्रिकेची हेड टू हेड आकडेवारी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी भारताने १६ आणि दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. प्रोटीजच्या मैदानावर दोन्ही संघ १० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सात सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले आहेत.