IND vs SA 2nd T20 Live Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी ट्वेंटी सामना आज (१२ जून) रोजी ओडिशास्थित कटकमधील बाराबती स्टेडियमवर झाला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना चार गडी राखून आपल्या नावे केला. हा भारताचा मालिकेतील सलग दुसरा पराभव ठरला. हेनिरक क्लासेनच्या ८१ धावांच्या बळावर आफ्रिकेने भारताचा पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

Live Updates
22:23 (IST) 12 Jun 2022
भुवनेश्वर कुमारच्या नावे सामन्यातील चौथा बळी

भुवनेश्वर कुमारने वेन पार्नेलचा बळी घेत आफ्रिकेचा चौथा गडी बाद केला.

22:18 (IST) 12 Jun 2022
हेनरिक क्लासेन बाद

क्विंटन डी कॉकच्या जागी संधी मिळालेल्या हेनरिक क्लासेन शानदार अर्धशतकीय खेळी करून बाद झाला.

22:14 (IST) 12 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल

भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या टप्प्यात आल्याचे दिसत आहे. आफ्रिकेला विजयासाठी २३ चेंडूत ९ धावांची आवश्यकता आहे.

21:59 (IST) 12 Jun 2022
हेनरिक क्लासेनचे शानदार अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनने शानदार अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३२ चेंडूंमध्ये टी ट्वेंटी कारकीर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले.

21:54 (IST) 12 Jun 2022
आफ्रिकन कर्णधार बावुमा अडकला चहलच्या जाळ्यात

भारतीय यफिरकीपटू युझवेंद्र चहने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार टेम्बा बावुमाला माघारी पाठवले आहे. सलामीला आलेल्या बावुमा खेळपट्टीवर स्थिर झाला होता. मात्र, चहलच्या फिरकीच्या जाळ्यात तो सहज अडकला. त्याने ३० चेंडूत ३५ धावा केल्या,

21:38 (IST) 12 Jun 2022
१० षटकांनंतर आफ्रिकेची ५७ धावांपर्यंत मजल

भारताने दिलेले १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १० षटकांनंतर आफ्रिकेच्या संघाने तीन बाद ५७ धावा केल्या आहेत. आफ्रिकेला विजयासाठी ६० चेंडूत ९२ धावांची गरज आहे.

21:27 (IST) 12 Jun 2022
डुसेनच्या रुपात आफ्रिकेला तिसरा धक्का

भुवनेश्वर कुमारने रॉसी व्हॅन डेर डुसेनला अवघ्या एका धावेवर बाद केले. कुमारच्या गोलंदाजीवर डुसेन त्रिफळाचित झाला.

21:15 (IST) 12 Jun 2022
पहिल्या पाच षटकांमध्ये आफ्रिकेचा धावफलक २ बाद २८ धावा

भारताने दिलेले १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पाच षटकांनंतर आफ्रिकेच्या संघाने २ बाद २८ धावा केल्या आहेत. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॉसी डुसेन मैदानावर उपस्थित आहेत.

21:05 (IST) 12 Jun 2022
भुवनेश्वर कुमारने घेतला दुसरा बळी

भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने या सामन्यातील दुसरा बळी घेतला आहे. कुमारच्या गोलंदाजीवर आवेश खानने ड्वेन प्रिटोरिअसचा अप्रतिम झेल घेतला.

https://platform.twitter.com/widgets.js

20:56 (IST) 12 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका

सलामीवीर रिझा हेनड्रिक्स स्वस्तात बाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या अप्रतिम चेंडूवर तो त्रिफळाचित झाला.

20:50 (IST) 12 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात

कटक येथे सुरू असलेल्या टी ट्वेंटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रिझा हेनरिक्स मैदानात उतरले आहेत.

20:26 (IST) 12 Jun 2022
अक्षर पटेलच्या रुपात भारताला सहावा झटका

अक्षर पटेल १० धावा करून त्रिफळाचित झाला. १७ षटकांनंतर भारताची अवस्था सहा बाद ११२ अशी झाली आहे.

20:14 (IST) 12 Jun 2022
भारतीय संघाचा धावफलक शंभरीपार

१५व्या षटकात भारतीय संघाचे शतक धावफलकावर लागले आहे. शंभरीपार करण्यापूर्वी भारताने आपले पाच गडी गमावले आहेत. सध्या दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल मैदानावर उपस्थित आहेत.

20:11 (IST) 12 Jun 2022
भारतीय फलंदाजी ढेपाळली!

श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा पाचवा गडी बाद झाला. श्रेयने ३५ चेंडूत ४० धावा केल्या. सध्या भारताची अवस्था पाच बाद ९८ अशी झाली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

20:04 (IST) 12 Jun 2022
हार्दिक पंड्या ९ धावांवर बाद

भारतीय फलंदाजी संकटात आली आहे. हार्दिक पंड्या ९ धावांवर बाद झाला आहे. वेन पार्नेलच्या गोलंदाजीवर पंड्या त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारताची अवस्था चार बाद ९० अशी झाली आहे.

19:52 (IST) 12 Jun 2022
दहा षटकांनंतर भारताचा धावफलक ३ बाद ७१

पहिल्या दहा षटकांनंतर भारताने तीन बाद ७१ धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार ऋषभ पंत फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्या मैदानात आला आहे.

19:47 (IST) 12 Jun 2022
कर्णधार ऋषभ पंत बाद

भारतीय कर्णधार फटकेबाजी करण्याच्या नादात बाद. केशव महाराजच्या गोलंदाजीवर डुसेनने पंतचा अप्रतिम झेल घेतला.

19:38 (IST) 12 Jun 2022
सात षटकांनंतर भारताचे अर्धशतक

सात षटकांनंतर भारतीय संघाच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर मैदानात उपस्थित आहेत.

19:33 (IST) 12 Jun 2022
ईशान किशनच्या रुपात भारताला दुसरा झटका

भारतीय सलामीवीर ईशान किशनच्या रुपात भारताला दुसरा झटका बसला आहे. ईशान ३४ धावा करून नार्कियाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

https://platform.twitter.com/widgets.js

19:30 (IST) 12 Jun 2022
ईशान किशनला जीवनदान

पावर प्लेच्या शेवटच्या षटकामध्ये ड्वे प्रिटोरिअच्या गोलंदाजीवर वेन पार्नेलने ईशान किशनचा झेल सोडला.

19:28 (IST) 12 Jun 2022
पावरप्लेनंतर भारताची १ बाद ४२ धावांपर्यंत मजल

पहिल्या पावर प्लेनंतर भारताने १ बाद ४२ धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर धावफलक हालता ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत.

19:24 (IST) 12 Jun 2022
पाच षटकांनंतर भारत १ बाद ३१

सलामीवीर ऋतुराज लवकर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशनने संयमी खेळ करण्यास सुरुवात केली आहे.

19:06 (IST) 12 Jun 2022
भारताला पहिला झटका

भारताचा सलामीवर ऋतुराज गायकवाड एक धाव करून बाद झाला. भारताची धावसंख्या १ बाद ३.

19:01 (IST) 12 Jun 2022
मुख्यमंत्री नवीन पटनायक सामन्यासाठी उपस्थित

सामना सुरू होण्यापूर्वी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते मैदानातील घंटा वाजवण्यात आली. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली मैदानात उपस्थित होते.

19:00 (IST) 12 Jun 2022
भारताच्या फलंदाजीला सुरुवात

कटक येथे सुरू असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. भारतीय सलामीवर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड मैदान उतरले आहेत.

18:37 (IST) 12 Jun 2022
आफ्रिकन यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक जखमी

दक्षिण आफ्रिकेचा तारांकित यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक हाताला जखम झाल्यामुळे आज खेळणार नाही. त्याच्याऐवजी हेनरिक क्लासेनला संधी देण्यात आली आहे.

18:33 (IST) 12 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js