India vs South Africa 2nd Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय संघ मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला होता. मागच्या सामन्यात कोहलीने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले होते, पण टीम इंडियाचा डावाने पराभव त्याला टाळता आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहलीने कसोटीच्या पहिल्या डावात ३८ तर दुसऱ्या डावात ७६ धावा केल्या होत्या. तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. कोहलीने आतापर्यंत आठ कसोटी सामन्यांच्या १६ डावांत ५२.०६च्या सरासरीने ८३३ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत त्याने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. दुसऱ्या कसोटीत त्याने १६७ धावा केल्या तर तो १००० धावा पूर्ण करेल.

कोहलीआधी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली होती

सचिन तेंडुलकरने भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १५ कसोटी सामन्यांच्या २८ डावात ११६१ धावा आहेत. तेंडुलकरची सरासरी ४६.४४ आहे. त्याने पाच शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. कोहली सध्या त्याच्यापेक्षा ३२८ धावांनी मागे आहे. या कसोटीत तेंडुलकरची बरोबरी करणे त्याच्यासाठी अवघड आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही फलंदाजांच्या एकूण रेकॉर्डवर जर नजर टाकली तर सचिनने २५ सामन्यात १७४१ धावा केल्या आहेत आणि कोहलीने १५ सामन्यात १३५० धावा केल्या आहेत.

हेही वाचा: IND vs AFG: रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत पुनरागमन करणार? पुढच्या आठवड्यात BCCI करणार संघाची घोषणा

के.एल. राहुल धोनीला मागे टाकू शकतो

के.एल. राहुलने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत ३६१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३०.०८ आहे. राहुलनेही दोन शतके झळकावली आहेत. भारताकडून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सध्या १०व्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे नवव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी (३७० धावा), वीरेंद्र सेहवाग (३८२ धावा), अजिंक्य रहाणे (४०२ धावा), सौरव गांगुली (५०६ धावा), चेतेश्वर पुजारा (५३५ धावा), व्हीव्हीएस लक्ष्मण (५६६ धावा) आहेत. राहुल द्रविड (६२४ धावा), विराट कोहली (८३३ धावा) आणि सचिन तेंडुलकर (११६१ धावा).

दुसऱ्या कसोटीत राहुलने १० धावा केल्या तर तो धोनीच्या पुढे जाईल. त्याच वेळी, तो सेहवागला आणि रहाणेला देखील मागे टाकू शकतो. सौरव गांगुलीच्या ५०६ धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला १४६ धावा कराव्या लागतील. राहुलने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते, त्यामुळे त्याच्याकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. जर त्याने असे केले तर तो गांगुलीला सुद्धा मागे सोडू शकतो.

हेही वाचा: Pakistan Cricket: शाहिद आफ्रिदीने आपल्याच जावयाच्या कर्णधारपदावर उपस्थित केला प्रश्न, म्हणाला, “शाहीन चुकून टी-२०…”

बुधवार ३ जानेवारीपासून दुसरी कसोटी सुरू होणार, केपटाऊनमध्ये हवामान कसे असेल?

सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता नाही, हलके ढग असतील पण सध्या तरी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस होईल असा कोणताही अंदाज नाही. ताशी २२ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. ७१ टक्के आर्द्रता राहील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd test in cape town kl rahul and virat kohli will make this special record find out avw
Show comments