Virat Kohli acting like Lord Ram on field today : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्याला बुधवारी (३ जानेवारी) केपटाऊनमध्ये सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेचा कार्यवाहक कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात ५५ धावांत गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. आफ्रिकन संघाच्या डावा दरम्यान विराट कोहलीची अनोखी शैली पाहायला मिळाली.

दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज फलंदाजीसाठी आला, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या डीजेने आदिपुरुष चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणे वाजवले. हे पाहून कोहली खूश झाला. त्याने हात जोडले आणि भगवान श्री राम यांच्यासारखे धनुष्य चालवण्याचे हावभाव केले. हे पाहून स्टेडियममध्ये बसलेले चाहते आनंदी झाले. कोहलीची ही शैली लोकांना खूप आवडली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे गाणे एकदिवसीय मालिकेदरम्यान देखील वाजवण्यात आले होते –

याआधीही केशव महाराज जेव्हा-जेव्हा फलंदाजीला आला आहे, तेव्हा हे गाणे वाजवण्यात आले. भारताविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान महाराज फलंदाजीला आला, तेव्हा पर्लमध्ये ‘राम सिया राम’ हे गाणे वाजले होते. तेव्हा केएल राहुलने केशव महाराजला याबद्दल विचारणाही केली होती.

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजच्या वेगवान माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेने टेकले गुडघे, अवघ्या ५५ धावांत आटोपला पहिला डाव

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला –

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्करम (२ ), डीन एल्गर (४), टोनी डीजॉर्ज (२), ट्रिस्टन स्टब्स (३), मार्को जॅनसेन (०), केशव महाराज (१ ), कागिसो रबाडा (१), नांद्रे बर्जर (४) धावांवर बाद झाले.

Story img Loader