India vs South Africa 2nd Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात ५५ धावांत गारद झाली. प्रत्युत्तरात भारताने १५३ धावा केल्या आणि पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा डाव १५३ धावांवर आटोपला

भारताचा पहिला डाव १५३ धावांवर आटोपला. भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या आहेत. एकवेळ भारताची धावसंख्या १५३/४ होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. यावेळी राहुल बाद झाल्याने टीम इंडियाला पुढे एकही धाव करता आली नाही. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने ३९ धावांची खेळी खेळली. शुबमन गिलने ३६ आणि विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने ८ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांना भोपळाही उघडता आला नाही. मात्र, मुकेशला एकाही चेंडूचा सामना न करता धावबाद झाला. शेवटचे सहा विकेट्स या तर एकही धाव न करता बाद झाले आहेत. हा लाजिरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.

कसोटी डावात सर्वाधिक शून्य धावांवर गडी बाद होण्याची नोंद

६- पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, कराची, १९८०
६ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, अहमदाबाद, १९९६
६ – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका, २००२
६ – भारत विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, २०१४
६ – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, दुबई (DSC), २०१८
६ – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, मिरपूर, २०२२
६ – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ अमेरिका २०२२
६ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केप टाउन, २०२४

दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत संघाला सामन्यात परत आणले. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला. मात्र, पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे ९८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय संघ सामन्यात पुढे आहे. आता या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतीय गोलंदाज हा सामना डावाच्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करतील. खेळपट्टीचा विचार करता भारतासाठी ५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य अवघड असू शकते.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्कराम (२४ धावा), डीन एल्गर (१७ धावा), टोनी डी जॉर्जी (१२ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१२ धावा), मार्को जॅनसेन (० धावा), केशव महाराज (१ धावा), कागिसो रबाडा (१ धावा), नांद्रे बर्जर बाद (४ धावा).

हेही वाचा: Suryakumar Yadav: नासिर हुसेनने एकदिवसीय फॉरमॅटमधील कामगिरीवरुन सूर्यकुमारवर केली टीका; म्हणाला तो, “तो सनकी क्रिकेटर…”

दोन्ही संघांची प्लेइंग११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd test team india all out for 153 runs on mohammad sirajs hard work avw